शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दैव बलवत्तर ! पुरात वाहून गेलेला शेतकरी बंधाऱ्यात अडकल्याने सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 14:07 IST

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

ठळक मुद्देखड्ड्यात पाय अडकल्याने शेतकऱ्याचा हातातून दोरी निसटली

पाथरी :  तालुक्यात सोमवारी (दि. 23) पहाटे मुसळधार पाऊस पडल्याने पाथरी-आष्टी रस्त्यावरील खेरडा गावातील नाल्याला पूर आला. नाल्यात अचानक तीन ते चार फूट पाणी आल्याने येथील मार्ग बंद पडला. याच दरम्यान शेतातून दूध घेऊन येत असलेली १० ते १५ शेतकरी पुरात अडकली. ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्यासाठी दुसऱ्या बाजूने दोरी बांधून प्रयत्न केले. मात्र, दोरीच्या सहाय्याने दुसऱ्या टोकाला जाताना एक शेतकरी पाण्यात पडला व पुढे वाहत गेला. सुदैवाने पुढे बंधारा असल्याने शेतकरी त्यात अडकला गेला व सुखरूप बाहेर पडला. 

पाथरी तालुक्यातील खेरडा गावापासून खेडूला गावाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर खेरडा गावापासून अगदी 400 मीटर अंतरावर मोठा नाला आहे. या नाल्यावर पाथरी आणि मानवत तालुक्यातील पावसाचे पाणी वाहून पुढे रामपुरी मार्गे गोदावरी पात्राला मिळते. सोमवारी पहाटे पाथरी आणि मानवत तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचे पाणी खेरडा खेडुळा नाल्याला आले. यामुळे सकाळी 7 वाजता पाण्याचा जोर वाढल्याने येथील पुलावरून 4 फूटवर पाणी वेगाने वाहू लागले. याच दरम्यान, खेरडा येथील काही शेतकरी पहाटे शेतात दूध काढण्यासाठी गेले होते. परत येत असताना ते पुरात अडकून पडले. रस्त्यावरून तीन ते चार फूट पाणी वेगाने वाहत असल्याने शेतकऱ्यांना गावात येता येत नव्हते. 

पुरामध्ये काही जण अडकले असल्याची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी पुलाकडे धाव घेतली. दुसऱ्या टोकाकडून दोरीच्या साह्याने शेतकऱ्यांना आणण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला. याचवेळी ज्ञानोबा बाबुराव उंडे (45) हा शेतकरी दोरीच्या सहाय्याने पाण्यातून दुसऱ्या टोकाकडे येत होता. अचानक उंडे यांचा पाय खड्ड्यात अडकल्याने ते खाली पडले. त्यांच्या हातातील दोरी सुटल्याने ते पुरात वाहत गेले. पुढे ३०० मीटर अंतरावर नाल्यावर बंधारा असल्याने उंडे त्यात अडकले. त्यानंतर उंडे बंधारातून बाहेर पडत गावात सुखरूप परतल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :floodपूरparabhaniपरभणीFarmerशेतकरी