शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी ‘वंचित’च्या बंदला जिल्हाभरात प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:21 IST

केंद्र शासनाच्या विविध निर्णयांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ यानिमित्त परभणी, पाथरी, मानवत, गंगाखेड, सोनपेठ आदी ठिकाणी रॅली काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाच्या विविध निर्णयांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ यानिमित्त परभणी, पाथरी, मानवत, गंगाखेड, सोनपेठ आदी ठिकाणी रॅली काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले़परभणी शहरात सकाळपासूनच व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती़ शहरातील शिवाजी चौक, कच्छी बाजार, स्टेशन रोड, गांधी पार्क, वसमत रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोड आदी भागातील दुकाने सकाळपासूनच बंद होती. शहरातील काही शाळांनी सुटी दिली होती तर काही ठिकाणच्या शाळा सुरू होत्या़ सकाळी १० च्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरांतर्गत रॅली काढली़ त्यानंतर दुपारी १़३० च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढून प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ त्यामध्ये सीएए, एनआरसी, एनपीआर हे कायदे रद्द करावेत, जामीया व जेएनयूमधील विद्यार्थ्यांना अमानूष मारहाण करणाऱ्यांना अटक करावी, सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण थांबवावे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, सर्व मागासवर्गीय महामंडळांचे कर्जमाफ करून नोकरीतील अनुशेष भरावा, आदींचा समावेश होता़ यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ़ धर्मराज चव्हाण, डॉ़ सुरेश शेळके, दादाराव पंडित, बी़ आऱ आव्हाड, गणपत भिसे, सुमीत जाधव, वंदना जोंधळे, अनिता वाघमारे, शेषराव जल्हारे, सिद्धार्थ कांबळे, आलमगीर खान, लखन सौंदरमल, संपत नंद, के़ डी़ चव्हाण, लिंबाजी उजागरे, मोहसन खान, रेखाताई खंदारे, उषाताई आयवले, जयश्री पुंडगे आदींच्या स्वाक्षºया आहेत़ जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही़पूर्णेत बंदला प्रतिसादपूर्णा : शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ दिवसभर व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती़ यानिमित्त डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमास भदंत उपगुप्त महाथेरो, मौलाना शमीम अहमद रिझवी, दादाराव पंडित, उत्तम खंदारे, अ‍ॅड़ धम्मा जोंधळे, प्रकाश कांबळे, अ‍ॅड़ हर्षवर्धन गायकवाड, जाकीर कुरेशी आदींची उपस्थिती होती़ यानिमित्त धरणे आंदोलनही करण्यात आले़गंगाखेडमध्ये धरणे आंदोलनगंगाखेड : येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ येथील व्यापारी प्रतिष्ठाने सकाळपासूनच कडकडीत बंद होती़ सकाळी ११ ते दुपारी १२़३० या कालावधीत वंचित आघाडी व इतर पक्ष संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर नायब तहसीलदार ज्ञानेश्वर घोंडगे यांच्यामार्फत राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले़ यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष वामनराव राठोड, यशवंत भालेराव, सिद्धोधन सावंत, संदीप भालेराव, राजेभाऊ साळवे, अजय हत्तीअंबिरे, बाळासाहेब पांचांगे, नगरसेवक चंद्रकांत खंदारे, अ‍ॅड़ शेख कलीम, अ‍ॅड़ सय्यद अकबर, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल अशपाक, प्रमोद मस्के, शेख मुस्तफा, हाफीज खालेद बागवान आदींची उपस्थिती होती़ चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़राणीसावरगाव येथेही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती़ या संदर्भात पोलिसांना दिलेल्या निवेदनावर वंचितचे शांतीराम फुलवरे, वैभव साळवे, प्रवीण कांबळे, राहुल साळवे, सतीश रायबोले, धम्मा झुंजारे, अर्जुन साळवे, धम्मानंद रायबोले आदींच्या स्वाक्षºया होत्या़जिंतुरात कडकडीत बंदजिंतूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारलेल्या जिंतूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ येथे व्यापाºयांनी स्वयंस्फूर्तीने व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती़ दुपारी २ पर्यंत बंदचा चांगलाच प्रभाव दिसून आला़ त्यानंतर हळूहळू काही ठिकाणची दुकाने उघडण्यात आली़ या संदर्भात वंचितच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले़ बंद यशस्वी करण्यासाठी मोहम्मद हारुण लाडले, एम़एजाज जिंतूरकर, इस्माईल हाश्मी आदींनी परिश्रम घेतले़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़ येलदरी येथे दुपारी १ पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती़ त्यानंतर हळूहळू व्यवहार सुरळीत झाले़बोरी येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला़ सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ १०० टक्के बंद होती़ सकाळी गावातील काही तरुणांनी व्यापारपेठेत फिरून बंदचे आवाहन केले़ त्याला व्यापाºयांनी प्रतिसाद दिला़पाथरीत वंचितची रॅली४पाथरी : सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या पाथरी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ शहरातील बाजारपेठ दिवसभर बंद होती़ सकाळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मुख्य रस्त्याने सेलू कॉर्नर परिसरापर्यंत रॅली काढली़४या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबतच जमात-ए-इस्लामी हिंद यांच्यासह विविध मुस्लिम संघटनांचा सहभाग होता़ रॅलीचे नेतृत्व विलास बाबर, अशोक पोटभरे, मंचक हरकळ, डी़टी़ रुमाले, खुर्चित बेग, रामभाऊ गालफाडे, अनंत कांबळे, कैलास पवार,कुमार भालेराव, विकास कदम यांनी केले़ बंद काळात शहरातील सर्व वाहतूक, शाळा, महाविद्यालये बंद होते़सोनपेठमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने बंद४सोनपेठ : वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदमुळे शुक्रवारी सोनपेठ शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती़ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील नायब तहसीलदार साहेबराव घोडके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी दिलेल्या निवेदनावर कचरूबा मुंडे, रामेश्वर पंडित, शंकर पंडागळे, सुशील सोनवणे, फिरोज कुरेशी, शफिक शेख, बाबा शेख, नरेश मुंडे, पवन बोकरे, अशोक रंजवे, मुन्ना मुंडे, लखन कांबळे, विजय तुपसमिद्रे, गजानन जाधव, सागर टाक, अजय राजभोज आदींची नावे आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन