शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

परभणी राज्यात जिल्हा २९ व्या स्थानावर : केवळ २३ कामांमधूनच स्वच्छतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:48 IST

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात स्वच्छतेचे जनजागरण करण्यासाठी सुरु केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला जिल्ह्यात बगल देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानात स्वच्छतेची केवळ २३ कामे केल्याने परभणी जिल्हा राज्याच्या क्रमवारीत २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. यावरुन जिल्ह्यातील प्रशासकीय उदासिनताच दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात स्वच्छतेचे जनजागरण करण्यासाठी सुरु केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला जिल्ह्यात बगल देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानात स्वच्छतेची केवळ २३ कामे केल्याने परभणी जिल्हा राज्याच्या क्रमवारीत २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. यावरुन जिल्ह्यातील प्रशासकीय उदासिनताच दिसून येत आहे.२ आॅक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधी जयंती साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश स्वच्छ करण्याच्या उद्देशाने प्रशासनाच्या मदतीने स्वच्छता हीच सेवा हे अभियान सुरु केले. राज्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अंतर्गत अभियान राबविले जात आहे. १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या काळात जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी स्वच्छतेची कामे करुन अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर देण्यात आली होती. मात्र याकामी प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने ठिकठिकाणी स्वच्छतेची कामे हाती घेऊन स्वच्छतेचे अभियान राबविणे, स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जनजागरण करणे अशा उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानाचा राज्यस्तरावरुन दररोज लेखाजोखाही घेतला जात आहे. दररोज जिल्हाभरात झालेल्या कामांची नोंद राज्यस्तरावर घेतली जात असून त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची क्रमवारी ठरविली जात आहे; परंतु, जिल्ह्यात या अभियानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एक सोपस्कर म्हणून अभियानाकडे पाहिले जात आहे. २८ सप्टेंबर रोजी राज्यस्तरावरील जिल्ह्यांच्या कामगिरीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये परभणी जिल्हा राज्यात २९ व्या स्थानावर फेकला गेला आहे. जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या काळात स्वच्छतेची केवळ २३ कामे झाली. त्यामुळे स्वच्छता ही सेवा हा केवळ सोपस्कार म्हणून राबविला जात असल्याचे दिसत आहे. परिणामी या अभियानाला थंड प्रतिसाद मिळत आहे.परभणी जिल्ह्यातूनच अभियानाची सुरुवातमहाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यात सुरु केलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानाचे उद्घाटन परभणी जिल्ह्यातूृन झाले होते, हे विशेष.१५ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परभणी येथे राज्यातील या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे अभियानाला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते मात्र परभणी जिल्ह्यातच थंड प्रतिसाद मिळत आहे.नाशिक जिल्हा राज्यात अव्वलस्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत राज्यात नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. हा जिल्हा राज्याच्या क्रमवारीत क्रमांक एकवर आहे. या अभियानामध्ये २८ सप्टेंबरपर्यंत नाशिक जिल्ह्यात स्वच्छतेची तब्बल ३४५० कामे झाली आहेत. सातारा जिल्हा दुसºया क्रमांकावर असून या जिल्ह्यात १२२५ कामे झाली. मराठवाड्यात मात्र अभियानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात सर्वाधिक ८२ कामे झाली असून हा जिल्हा राज्याच्या क्रमवारीत १९ व्या स्थानावर आहे. ६१ कामांसह लातूर जिल्हा २० व्या, ५० कामांसह हिंगोली जिल्हा २१ व्या क्रमांकावर आहे. नांदेड जिल्ह्यात ३७ कामे झाली असून औरंगाबाद जिल्ह्यात २८ कामे झाली आहेत. औरंगाबाद राज्याच्या क्रमवारीत २८ व्या क्रमांकावर आहे. तर जालना जिल्हा ३५ व्या क्रमांकावर आणि उस्मानाबाद जिल्हा ३६ व्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीNashikनाशिकOsmanabadउस्मानाबादBeedबीड