शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
2
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
3
"माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
4
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
5
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
7
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
8
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
9
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...
10
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
11
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
12
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
13
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
14
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
15
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
16
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
17
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
18
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
19
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
20
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

अपंग प्रमाणपत्र केंद्राला टाळे

By admin | Updated: March 4, 2015 15:38 IST

तालुक्यातील /अस्थिव्यंग रूग्णांना अपंगाचे प्रमाणपत्र उपजिल्हा रूग्णालयात देण्यासाठी सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षाला मान्यता नसल्यामुळे टाळे लागले

मोहन बोराडे /सेलूतालुक्यातील /अस्थिव्यंग रूग्णांना अपंगाचे प्रमाणपत्र उपजिल्हा रूग्णालयात देण्यासाठी सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षाला मान्यता नसल्यामुळे टाळे लागले असून अपंगाना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी परभणी जिल्हा रूग्णालयाची वारी अनिवार्य झाली आहे. तालुक्यातील अस्थिव्यंग रूग्णांना अपंगाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी परभणी येथील रूग्णालयात जावे लागते. त्यासाठी सेलूतील उपजिल्हा रूग्णालयातच अस्थिव्यंग अपंगाना प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले. परंतु, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून या केंद्राला मान्यता मिळाली नसल्यामुळे या केंद्रातून एकाही अपंगाला प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील अस्थिव्यंग अपंगाना प्रमाणपत्र काढण्यासाठी परभणी येथील जिल्हा रूग्णालयात हेलपाटे मारावे लागणार आहेत. उपजिल्हा रूग्णालयात अस्थिव्यंग अपंगांना अपंगाचे प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र केंद्राचे उदघाटन आ. विजय भांबळे यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी झाले होते. प्रत्येक शनिवारी अस्थिव्यंगांना अपंगाचे प्रमाणपत्र देण्याची सुविधा करण्यात आली होती. परंतु, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे तालुक्यातील अपंगाना या केंद्रातून प्रमाणपत्र मिळू शकले नाही. आरोग्य विभागाच्या परवानगी पूर्वीच अपंग प्रमाणपत्र केंद्र सुरू करण्याचा खटाटोप संबंधितांनी केला. मात्र यात अपंगांची फरफट झाली. अस्थिव्यंग अपंगांना उपजिल्हा रूग्णालयात अपंगाचे प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करणे संबंधी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला होता. परंतु, सुरू करण्यात आलेल्या केंद्राला मान्यता मिळाली नाही. विशेष म्हणजे, मान्यता येण्यापूर्वीच हे केंद्र सुरू करून अपंगाचे एक शिबीरही घेण्यात आले. तालुक्यातील जवळपास १७ अस्थिव्यंग अपंगानी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या केंद्रात सर्व दस्तावेज दाखल केले होते. परंतु, केंद्राला मान्यताच नसल्यामुळे या अपंगांना प्रमाणपत्र काढण्यासाठी परभणीला जावे लागणार आहे. दरम्यान, अस्थिव्यंग अपंगाना प्रमाणपत्र उपजिल्हा रूग्णालयात मिळत असल्याची चर्चा झाली. त्यानंतर शेकडो अस्थिव्यंग अपंगानी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली. परंतू रूग्णालयातून त्यांना परभणीला जाण्याचा सल्ला मिळाल्या नंतर अस्थिव्यंग अपंगांची घोर निराशा झाली आहे.

 ■ उपजिल्हा रूग्णालयात अस्थिव्यंग अपंगांना प्रमाणपत्र देण्यासाठी तीन सदस्यीय समितीही स्थापन केली होती. या समितीत वैद्यकिय अधिक्षक, अस्थिरोगतज्ज्ञ व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान, राज्यात ३८ केंद्र असल्यामुळे नवीन केंद्राला मान्यता मिळाली नाही, असे सूत्रांनी सांगितले. उपजिल्हा रूग्णालयात अस्थिव्यंग अपंगाना प्रमाणपत्र केंद्र सुरू करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. १७ अस्थिव्यंग अपंगानी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रात दस्तावेज दाखल केले आहेत. हे दस्तावेज जिल्हा रूग्णालयात पाठवून त्यांना त्याठिकाणाहून प्रमाणपत्र मिळणार आहे. -डॉ. नरेंद्र वर्मा, वैद्यकीय अधीक्षक