शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उद्योगातून विकासाचा ध्यास; कोल्हावाडीत ३२ महिलांच्या गटाने केली तुतीच्या नर्सरीची स्थापना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 15:10 IST

मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील ३२ महिलांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादनासाठी गट तयार केला असून, तुतीची लागवड करुन कोष निर्मितीही केली जात आहे. 

ठळक मुद्दे हजारो रुपये खर्च करुनही कापसापासून उत्पादन निघत नसल्याने तालुक्यातील कोल्हावाडी येथील महिला शेतकर्‍यांनी वेगळा निर्णय घेतला३२ महिला शेतकर्‍यांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणी : मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील ३२ महिलांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादनासाठी गट तयार केला असून, तुतीची लागवड करुन कोष निर्मितीही केली जात आहे. 

मानवत तालुक्यात यावर्षी सोयाबीन, कापूस पिकांनी दगा दिला आहे. बोंडअळीमुळे कापसाचे सर्व क्षेत्र हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कापूस पीक घ्यायचे की नाही, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. हजारो रुपये खर्च करुनही कापसापासून उत्पादन निघत नसल्याने तालुक्यातील कोल्हावाडी येथील महिला शेतकर्‍यांनी वेगळा निर्णय घेतला आहे. शेतीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न निघेल व आपला विकास होईल, अशी अपेक्षा बाळगून येथील ३२ महिला शेतकर्‍यांनी एकत्र येत रेशीम कोष उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील वातावरणही रेशीमसाठी अनुकूल असून राज्य शासनाने २०१६-१७ या वर्षापासून  मनरेगा योजने अंतर्गत रेशीम कोष उत्पादनासाठी तुती लागवड करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी कुशल ९० हजार, अकुशलसाठी २ लाख असे २ लाख ९० हजार रुपये असे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील महिलांनी एकत्र येत ३२ महिलांचा गट तयार केला.

या गटामध्ये गावातील इतर बचतगटातील महिलांनीही सामावून घेतले. सध्या मनरेगा योजनेअंतर्गत तुतीची लागवड करण्यात आली आहे. तुतीची लागवड करुन नर्सरी सुरु केली असून रेशीम कोष, तुती लागवडीसाठी देवनांद्रा येथील माऊली टेकाळे यांच्या रेशीम कोष उद्योगाला या महिला गटांनी नुकतीच भेट देऊन रेशीम उद्योगाची पाहणी केली. या गटामध्ये माजी सरपंच वर्षा भिसे, शारदा भिसे, मीरा भिसे, उषा भिसे, उर्मिला भिसे, अनुराधा भिसे, वंदना भिसे, सरस्वती भिसे, मनकर्णा भिसे, कमल भिसे आदी महिलांचा समावेश आहे. सामूहिक शेती करुन रेशीम कोष उत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता साधण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिला शेतकरी येत असून रेशीम कोष उत्पादनाच्या माध्यमातून शेती करण्याचा मनोदयही केला जात आहे. 

बाजारपेठेत मागणीजागतिक बाजारपेठेमध्ये रेशीम कोषाला चांगली मागणी आहे. नगदी पीक असल्याने यातून आर्थिक विकास साधता येतो. तालुक्यातील वातावरणही पोषक असून या माध्यमातून शेती करता येते, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. थोडेसे नियोजन व मेहनत घेण्याची तयारी महिलांनी केली असून थोड्या शेतीमध्ये जास्त उत्पादन काढण्याची संधी निर्माण झाली आहे. महिलाही सकाळपासूनच तुतीचे रोपे जोपासण्यासाठी कामाला लागत आहेत.

महिलांचा सहभाग महत्त्वाचाराज्य शासनाने तुती लागवडीचा मनरेगा योजनेत समावेश केला आहे. शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी या व्यवसायात महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरणारा आहे. कोल्हावाडी येथील महिला शेतकरी पुढे आल्या असून रेशीम कोष उत्पादन वाढविण्यास मदत होणार आहे. - डी.ए. हाके, सहाय्यक संचालक

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी