शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील साडेपाचशे शस्त्रे पोलिसांकडे जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:11 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ५५० शस्त्र परवानाधारकांकडून जमा करून घेतले आहेत़ उर्वरित परवानाधारकांकडे शस्त्र जमा करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागातून देण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ५५० शस्त्र परवानाधारकांकडून जमा करून घेतले आहेत़ उर्वरित परवानाधारकांकडे शस्त्र जमा करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागातून देण्यात आली़लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्र जमा करून घेतले जातात़ या अनुषंगाने १६ मार्च रोजी छाननी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली़ या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव, गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिरे, पूर्णा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेचे उपनिरीक्षक सी़ए़ साखरे यांची बैठकीस उपस्थिती होती़ निवडणूक कालावधीमध्ये परवानाधारकांकडून शस्त्र जमा करून घेणे आवश्यक आहे़ पोलीस विभागाने हे शस्त्र जमा करून घ्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी बैठकीत दिल्या होत्या़ तसेच एखाद्या परवानाधारकाने विहित मुदतीत शस्त्र जमा न केल्यास त्याच्यावर खटला दाखल करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले़ जिल्ह्यात ८५१ नागरिकांना शस्त्र परवाना दिला आहे़ त्यांच्याकडून शस्त्र जमा करून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे़ आतापर्यंत ५५० शस्त्र जमा झाले आहेत़ संबंधित परवानाधारकाच्या पोलीस ठाण्यात हे शस्त्र जमा करून घेतले जाते़ निवडणुकीनंतर आठ दिवसांमध्ये परवाना धारकास शस्त्र परत केले जाते़चौघांचे अर्ज फेटाळलेनिवडणुकीच्या काळात शस्त्र परवानाधारकाकडील शस्त्र जमा करून घेतले जात असले तरी एखाद्या परवानाधारकास शस्त्राची नितांत आवश्यकता असल्यास परवानाधारक या संदर्भात अर्ज करून शस्त्र जमा करण्याच्या प्रक्रियेतून सूट मागू शकतो़ या पार्श्वभूमीवर ४ परवानाधारकांनी अर्ज केले होते़ या अर्जावर छाननी समितीच्या बैठकीत चर्चा झाली़ अर्जात नमूद केलेली कारणे संयुक्तीक नसल्याचे सांगत समितीने चौघांचेही अर्ज फेटाळून लावले असून, त्यांचे शस्त्र जमा करून घेण्याचे आदेश दिले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकPoliceपोलिस