शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीच्या मागणीसाठी परभणीतील शेतकरी आक्रमक

By admin | Updated: April 26, 2017 13:44 IST

तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी परभरणीतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करुनही आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला.

 ऑनलाइन लोकमत

परभणी, दि. 26 -  तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी परभरणीतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. 22 एप्रिलपर्यंत रांगेत असलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी परभणीत तसे आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी वसमत रस्त्यावर पाऊण तास रास्तारोको आंदोलन केले.
 
जिल्ह्यातील 5 हमीभाव तूर खरेदी केंद्र २२ एप्रिल रोजी बंद झाले आहेत. केंद्र बंद असले तरी खरेदीला मुदतवाढ मिळेल, या आशेने परभणीत तूर घेऊन आलेले शेकडो वाहने रांगेत उभी आहेत. 
 
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे, अशाची तूर खरेदी करण्याची घोषणा मंगळवारी केली आहे. मात्र परभणी येथे अद्याप तसे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याने बुधवारी सकाळी परभणीत तूर खरेदी बंदच होती. शासनाचे जसे आदेश प्राप्त होतील त्याप्रमाणे खरेदी सुरू केली जाईल, असे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
संतप्त शेतकरी रस्त्यावर
दरम्यान, बुधवारी सकाळी तूर खरेदी सुरु झाली नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी माकपचे विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली परभणी- वसमत रस्त्यावर खरेदी केंद्राजवळच पाऊण तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या एक महिन्यापासून शेतकरी तूर विकण्यासाठी नफेडच्या खरेदी केंद्रावर रांगेत आहेत.  तेव्हा सर्व तुरीची खरेदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. 
 
शेतकऱ्यांचा मालाला आधारभूत भाव देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे तूर खरेदी करुन सरकार उपकार करत नाही. जे व्यापारी हमी भावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करतील, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई शासनाने केली पाहिजे. रांगेत असलेल्या आणि घरी साठवून ठेवलेल्या सर्व तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांना तत्काळ चुकारे द्यावेत, अशी मागणी विलास बाबर यांनी केली.
 
परभणीत ९५ वाहनांची नोंदणी
परभणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर २२ एप्रिलपर्यंत ९५ वाहनांची नोंदणी झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार आहे.
 
आदेश येताच होणार केंद्र सुरू
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २२ एप्रिलपर्यंत १ लाख १८ हजार ६६६ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. रांगेत असलेल्या वाहनांची नोंदणी झाली असून, शासनाचे आदेश प्राप्त होताच खरेदी केंद्र सुरू केले जाईल. - के जे शेवाळे, सहायक मार्केटिंग अधिकारी