शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

परभणी जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दिवसाची जमावबंदी लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 13:08 IST

corona virus : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : इतर व्यवहारांवरही आणले निर्बंध

परभणी : कोरोना रुग्ण (corona virus ) वाढत असल्याने राज्य शासनाने दिवसाची जमावबंदी लागू केली आहे. याच आदेशातनुसार जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी १० जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात दिवसाची जमावबंदी लागू केली आहे. तसेच इतर काही बाबींवरही निर्बंध घातले आहेत.

जिल्ह्यातही कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश १० जानेवारी रोजी काढले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यात सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास प्रतिबंध केला आहे. तसेच रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी ११ जानेवारीपासून जिल्ह्यात केली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विभागप्रमुखांच्या परवानगी शिवाय कार्यालय प्रवेश बंदजिल्हाधिकारी यांनी शासकीय कार्यालयांसाठीही निर्बंध जाहीर केले आहेत. कोणत्याही शासकीय कार्यालयात कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीशिवाय नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई राहणार आहे. तसेच प्रमुख कार्यालयांमध्ये नागरिकांशी चर्चा करण्यासाठी व्हीसीची सुविधा कार्यान्वित करावी, शासकीय बैठका ऑनलाइन स्वरूपात घ्याव्यात, कार्यालयाच्या वेळेत बदल करून शक्य झाल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ ही सुविधा द्यावी, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर मशीन ठेवावी, अशा सूचना दिल्या आहेत.

खाजगी कार्यालयांना काय सूचना?खाजगी कार्यालयांच्या व्यवस्थापनाने ‘वर्क फ्रॉम होम’ला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. ५० टक्के पेक्षा जास्त कर्मचारी उपस्थिती राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यालयीन वेळा २४ तास करून कर्मचाऱ्यांच्या ड्युटी कालावधीमध्ये आवश्यक ते बदल करावेत.

सलून, व्यायामशाळेत ५० टक्के उपस्थितीसलून दुकाने आणि व्यायाम शाळांवरही निर्बंध घातले आहेत. त्यात या दोन्ही ठिकाणी ५० टक्के क्षमतेसह उपस्थिती राहण्यास मुभा दिली आहे. दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत सलून दुकाने बंद असतील. या दुकानांमध्ये केशकर्तनाशिवाय इतर प्रकारच्या कामांना मनाई आहे. व्यायाम शाळेतही ५० टक्केसह उपस्थिती बंधनकारक केली आहे. केवळ लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच व्यायामशाळेत प्रवेश द्यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी