शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

पीक विम्याचे १३२ कोटी सरकारकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 6:05 PM

७५ टक्के रक्कम कंपनीकडे बाकी

ठळक मुद्दे विमा कंपनीने झटकले हातकृषी विभागाला दिले लेखी उत्तर

- मारोती जुंबडे

परभणी : खरीप हंगाम २०१८ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी तुरीचा पीक विमा काढला होता, त्या शेतकऱ्यांना कंपनीने २५ टक्के अग्रीमची रक्कम देऊ केली आहे; परंतु, ७५ टक्के रक्कम कंपनीकडे बाकी असताना कंपनीने मात्र, राज्य व केंद्र शासनाकडेच १३२ कोटी रुपये थकले असल्याचे म्हणत या प्रकरणात हात झटकले आहेत. तसे लेखी पत्र कृषी विभागाला विमा कंपनीने ईमेलद्वारे पाठविले आहे. 

गतवर्षी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ राज्य शासनाने ९ तालुक्यांमध्ये दुष्काळही जाहीर केला होता़ त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, तूर व कापूस या पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला़ शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघालेला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले होते. त्यामुळे २०१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करताना विमाही उतरविला होता़ इफ्को टोकिया जनरल इन्शुरन्स कंपनीकडे जिल्ह्यातील ५ लाख ८६ हजार १४४ शेतकऱ्यांनी आपली पिके संरक्षित केली होती़ महसूल प्रशासनानेही जिल्ह्यातील पिकांची आणेवारी जाहीर केली़  नजर आणेवारी आणि अंतीम आणेवारीमध्ये पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची नोंद झाली होती़ शासनाच्या निर्णयानुसार विमा काढलेल्या क्षेत्रामध्ये किमान १५ दिवस पाऊस झाला नाही तर विमा कंपनीला अग्रीम म्हणून २५ टक्के रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे़  

या नियमानुसार जिल्ह्यातील ७८ हजार तूर उत्पादक शेतकऱ्यांना इफ्को टोकिया विमा कंपनीने २५ टक्के अग्रीम मंजूर करून, त्यापोटी असणारी १८ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावरही वर्ग केली. त्यानंतर उर्वरित ७५ टक्के रक्कम तूर उत्पादकांना एक वर्ष उलटले तरीही अद्याप मिळालेली नाही़ त्यामुळे ४५ हजार शेतकरी तूर पिकाच्या विम्यापासून अद्यापही वंचित आहेत़ 

याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्याने कृषी विभागाने विमा कंपनीकडे तूर पिकाच्या विम्यासाठी पाठपुरावा करुन थकित विम्याच्या रक्कमेबद्दल विचारणा केली. तेव्हा या विमा कंपनीने राज्य शासनाकडे ६६ कोटी १३ लाख व केंद्र शासनाकडे ६६ कोटी १३ लाख असे एकूण १३२ कोटी २६ लाख रुपये थकित आहेत. त्यामुळे जोपर्यंत हे पैसेच मिळत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांना आपल्या मोबदल्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे लेखी स्वरुपात २४ सप्टेंबर रोजी मेलद्वारे पत्र पाठवून सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४५ हजार तूर उत्पादक शेतकऱ्यांना आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे  दिसून येत आहे. 

१९ कोटी रुपये येणे अपेक्षितजिल्ह्यातील ३८ मंडळांपैकी केवळ २४ मंडळातील जवळपास ४५ हजार शेतकऱ्यांना तूर पिकाचा विमा लागू झाला आहे. यासाठी १९ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. नुकसान झालेल्या पिकांचा विमा तात्काळ देण्यात यावा, यासाठी लोकप्रतिनिधी, लाभार्थी शेतकरी वारंवार कृषी विभाग व राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु, राज्य व केंद्र शासनाकडूनच विम्याचे पैसे वेळेत देण्यात येत नसतील तर शेतकऱ्यांना त्यांचा लाभ वेळेत मिळणे अशक्य आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करुन तात्काळ शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाparabhaniपरभणीFarmerशेतकरी