शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

२ हजाराची नोट बदलण्यासाठी बँकांमध्ये काउंटर सज्ज, पहिल्या दिवशी ग्राहक मात्र तुरळक

By राजन मगरुळकर | Updated: May 23, 2023 17:24 IST

प्रक्रीयेचा पहिला दिवस : संभ्रम आणि प्रश्नावलीचा भडिमार

परभणी : चलनातील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. शहरातील विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये या नोटा बदलण्यासाठी विविध बँकेच्या शाखेमध्ये ग्राहकांची धांदल उडू नये, गैरसोय होऊ नये, यासाठी काउंटर सज्ज ठेवल्याचे दिसून आले. परंतू, पहिल्याच दिवशी अगदी बोटावर मोजण्या इतक्या तुरळक ग्राहकांनी बँकेत हजेरी लावून नोटा बदलल्याचे बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

परभणी शहरात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये महत्त्वाच्या आणि सर्वाधिक शाखा, खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियात आरबीआयच्या नियमाप्रमाणे सदरील प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली. शहरात जवळपास दहा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा आहेत. या सर्व ठिकाणी रोख रक्कम काढणे तसेच पैसे जमा करणे यासाठी असलेल्या कॅश काऊंटरवर दोन हजारांची नोट बदलण्यासाठीची प्रक्रिया ठेवण्यात आली होती. त्यानुसार संबंधित काउंटरवर ग्राहकांनी तसेच नागरिकांनी स्वतःच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले आहे. याशिवाय अन्य राष्ट्रीयकृत तसेच खासगी आणि सहकारी बँका, पतसंस्था येथेही यंत्रणा सुरु करण्यात आली आहे.

घाई न करण्याचे आवाहनअजून तरी वेगळे असे कोणतेही कॅश काऊंटर सुरू करण्यात आलेले नाही, असे दिसून आले. एकंदरीत कोणत्याही बँकेमध्ये नोटा बदलण्यासाठी गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेने सुरू होती. बँकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देणे, संबंधितांना जनजागृती करून नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी असल्याने नागरिकांनी ग्राहकांनी घाई करू नये, असे आवाहन बँकेत आल्यानंतर केले जात होते.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणparabhaniपरभणीbankबँक