शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सोशल डिस्टनसिंगची एशितैशी ! परभणी जिल्ह्यात बँकांसमोरील गर्दी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 14:31 IST

पैसे काढण्यासाठी बँका आणि ग्राहक सेवा केंद्रासमोर गर्दी

ठळक मुद्देजनधन खात्यातील पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी

परभणी : केंद्र शासनाच्या जनधन योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेले पाचशे रुपयांचे अनुदान बँकेतून काढण्यासाठी परभणी जिल्ह्यातील बहुतांश बँका आणि ग्राहक सेवा केंद्र समोर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी जमू लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात हे चित्र कायम आहे. 

कोरोना संदर्भात लॉक डाऊन करण्यात आल्यानंतर केंद्र शासनाने जनधन योजनेअंतर्गत महिला खातेदारांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये या प्रमाणे तीन महिन्यांचे 1 हजार पाचशे रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने हे अनुदान तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील बँकांमध्ये संबंधित खातेदाराच्या बँक खात्यावर जमा झाले. अनुदानाची ही रक्कम काढण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून बँकांसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीमुळे सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचा बोजवारा उडत असल्याचे दिसून येत आहे. बँकेत एकाच ग्राहकाला प्रवेश दिला जात असला तरी बँकेबाहेर मोठी गर्दी होत आहे. ही स्थिती गुरुवारीही परभणी शहरासह,  गंगाखेड, पाथरी, जिंतूर आदी शहरांमधील बँका समोरही पहावयास मिळाली. त्यामुळे आता गर्दी टाळण्याच्या अनुषंगानें प्रशासनास ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

परभणी जिल्ह्यात आतापर्यंत प्रशासनाने घेतलेल्या कडक निर्णयामुळे तसेच नागरिकांनीही त्याला साथ दिल्याने एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. विशेष म्हणजे परभणीच्या चारही शेजारी जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आले आहेत. असे असताना या संदर्भात अधिक गांभीर्याने काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अशात बँकांसमोर गर्दी दिसत असल्याने नागरिकांची धडधड वाढली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी