शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : पुण्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात होते गंगाखेडचे ११ जण; सर्वजण निगराणीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 18:46 IST

. एकाच गावातील अकरा जण संशयित आढळल्याने खळबळ

ठळक मुद्देऔरंगाबाद येथील नाथ षष्ठी कार्यक्रमात झाली होती भेट

गंगाखेड: पुणे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तालुक्यातील एकाच गावातील अकरा जणांना संशयित म्हणून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात व एकास सेलू येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. एकाच गावातील अकरा जण संशयित आढळल्याने खळबळ उडाली आहे.

गंगाखेड तालुक्यातील रहिवाशी असलेली एक व्यक्ती नौकरीनिमित्त पुणे येथे राहत आहे. कोरोना विषाणूंची लक्षणे दिसून आल्याने पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या या व्यक्तीस कोरोना विषाणूंचा बाधा झाल्याची माहिती दि. २२ मार्च रविवार रोजी केलेल्या तपासणीतुन समोर आली. कोरोना विषाणूंची बाधा झाल्याने सध्या त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेली ही व्यक्ती दि. १३ मार्च ते दि. १५ मार्च दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण नाथशष्टी यात्रेत सहभागी झाली होती. यावेळी नातेवाईक असलेले गंगाखेड तालुक्यातील एकाच गावातील अकरा जण त्यांच्या संपर्कात आले होते. 

यावरून आरोग्य विभागाने बुधवारी संबंधित गावात जाऊन रुग्णाच्या संपर्कात आलेली नऊ जण व दिल्ली येथील निझामुद्दीन येथून परतलेल्यांच्या संपर्कात आलेल्या एकास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे, डॉ. वसीम खान, डॉ. राजकुमार गिते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रवीण जायभाये, ज्ञानेश्वर गुट्टे, शेख खाजा यांनी एकूण अकरा जणांचे स्वब नमुने घेत तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले आहे. दरम्यान, यातील एकास सेलू येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. यापूर्वी पूर्वी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या सर्वच बारा संशयितांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने समाधानी असलेल्या आरोग्य प्रशासनात बुधवार व गुरुवार रोजी सापडलेल्या अकरा संशयितांमुळे मात्र खळबळ उडाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी