शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

कोरोना लसीकरणास पुन्हा गती येणार; नाकावाटे घेण्याच्या 'इन्कोव्हॅक' लसीचा बुस्टर मिळणार

By राजन मगरुळकर | Updated: April 25, 2023 18:28 IST

राज्यात कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या, मृत्यू प्रमाण पाहता ही लस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

परभणी : आरोग्यसेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोविड लसीकरणाबाबत झालेल्या बैठकीमध्ये राज्य शासनामार्फत कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीची खरेदी केली जाणार आहे. त्यानुसार सर्व जिल्हास्तरावर, महापालिका स्तरावर या लसींचे वितरण आगामी काही दिवसांत केले जाणार आहे. त्यामुळे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये लागलेल्या लसीकरणाच्या ब्रेकला आता पुन्हा गती प्राप्त होणार आहे. याबाबत राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.

कोविड लसीकरण कार्यक्रमात नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीच्या वापराबाबत आरोग्य सेवा आयुक्त यांनी दि. १८ एप्रिलला बैठक घेतली. यामध्ये विविध जिल्ह्यात, महापालिका स्तरावर लसीकरण कार्यक्रमांतर्गत इन्कोव्हॅक लस पुरवठा करण्याचे नियोजन लवकरच केले जाणार आहे. राज्यात कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या, मृत्यू प्रमाण पाहता ही लस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

साठ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्यइन्कोव्हॅक लसीचा पुरवठा सर्व जिल्ह्यांना झाल्यानंतर साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोससाठी ही लस वापरली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी याचे प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय ही लस १८ वर्षांवरील सर्व वयोगटांना दिली जाणार आहे. यामध्ये एकूण दोन डोस दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक डोसमध्ये २८ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

लवकरच होणार पुरवठाया लसीची राज्यातील सर्व जिल्ह्यातील मागणी नोंदवून त्याप्रमाणे त्याचा पुरवठा करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन केले जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय आरोग्य अधिकारी महापालिका यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

अशी दिली जाणार इन्कोव्हॅक लसशासनाच्या नव्या सूचनेनुसार ही लस बूस्टरसाठीच नव्हे तर पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राहणार आहे. ज्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नाही, अशांनाही कोविडपासून संरक्षणासाठी लस देण्यात येणार आहे. लसीचे चार चार थेंब नाकपुडीमध्ये टाकण्यात येतील. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी पुन्हा दुसरा डोस घ्यावा लागेल. यानंतर सहा महिन्यांनी हाच डोस बूस्टर डोस म्हणून दिला जाणार आहे.

परभणी जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारीएकूण लोकसंख्या - २० लाख ८९ हजार ४३९बारा वर्षांवरील लसीकरण उद्दिष्ट - १७ लाख दोन हजार ८१५पहिला डोस - १३ लाख ४३ हजार ६४७ (८७.९१ टक्केवारी)दुसरा डोस - दहा लाख ४४ हजार २९८ (६१.३३ टक्केवारी)प्रिकॉशन डोस - ९८ हजार ५४२ (५.७९ टक्के)

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणी