सध्या कोरोनाचा संसर्ग कमी आला असून मागील दोन दिवसांपासून बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. बुधवारी एकूण ५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आयटीआय हॉस्पिटलमध्ये १, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २ आणि खासगी रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ४ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
आरोग्य विभागाला १ हजार ७४ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ७९२ अहवालांमध्ये ८६ आणि रॅपिड टेस्टच्या २८२ अहवालांमध्ये ४४ अशा १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यात एकूण ४९ हजार ४०१ बाधित रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ४४ हजार २४० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार २१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ४४ रुग्ण उपचार घेत आहेत.
६२ जणांना सुट्टी
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या १६२ रुग्णांना कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याने सुट्टी देण्यात आली. मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.