शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे बजेट कोलमडले; लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या १३ कोटींच्या कामांच्या मान्यता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 19:09 IST

आमदार व खासदार यांनी नागरी आणि ग्रामीण भागात सुचविलेल्या कामांना मंजुरी देण्याची योजना ९ मार्च २०१८ पासून राज्यात सुरू करण्यात आली.

ठळक मुद्दे१२ कोटी ८७ लाखांची कामे अडचणीत

- अभिमन्यू कांबळे

परभणी : कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत २०१८ ते २०२० या  कालावधीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या १२ कोटी ८७ लाख रुपयांच्या कामांपैकी कार्यारंभ आदेश निर्गमित न दिलेल्या सर्व कामांच्या मान्यता रद्द करण्याचे राज्य शासनाने दिले आहेत.

देशभरात मार्चपासून कोरोनामुळे आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. अनलॉकनंतर बरेच व्यवहार सुरळीत होत असले तरी राज्याच्या तिजोरीत निर्माण झालेला खडखडाट कायम आहे. त्यामुळे राज्य शासनाने आरोग्य विभागा व्यतिरिक्त अन्य विभागांना दिलेल्या निधीला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. याचा मोठा फटका समाजकल्याण विभागाच्या योजनांनाही बसला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती व गावांचा विकास करण्यासाठी व या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी कामे करण्याकरीता आमदार व खासदार यांनी नागरी आणि ग्रामीण भागात सुचविलेल्या कामांना मंजुरी देण्याची योजना ९ मार्च २०१८ पासून राज्यात सुरू करण्यात आली. त्यानुसार  जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना दलित वस्त्यांमध्ये सीसी रस्ते, नाली बांधकाम, स्मशानभूमी विकास, समाज मंदिर उभारणे, सभामंडप उभारणे, बुद्धविहारास संरक्षण भिंत उभारणे, विद्युतीकरण करणे आदी प्रकारची कामे लोकप्रतिनिधींनी गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात सुचविली. या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. अनेक ठिकाणी ही कामे करण्यातही येत आहेत. असे असताना राज्याच्या तिजोरीत कोरोनामुळे खडखडाट निर्माण झाल्याने ९ मार्च २०१८ ते ३१ मार्च २०२० या कालावधीमध्ये  सुचविलेल्या  कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत.

तीन वर्षात ४ वेळा दिली होती मंजुरी६ जानेवारी २०१९ रोजी जिल्ह्याला ५ कोटी ४१ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली होती. तसेच ६ मार्च २०१९ रोजी ६२ लाख रुपयांची तर १६ ऑगस्ट २०१९ रोजी २ कोटी ९४ लाख रुपयांची आणि २६ मार्च रोजी ३ कोटी ९० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली होती.  या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या होत्या. २९ ऑक्टोबर रोजी या संदर्भात समाजकल्याण विभागाने नविन आदेश काढला असून, त्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधी उपलब्धतेस मर्यादा येत असल्याने प्रशासकीय मान्यता दिलेल्या, परंतु, अद्याप कार्यारंभ आदेश निर्गमित न केलेल्या सर्व कामांच्या मान्यता रद्द करण्याचे नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :fundsनिधीparabhaniपरभणी