शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीएफचे खाते काढण्याला कंत्राटदारांनी दिला खो

By admin | Updated: July 15, 2017 23:45 IST

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कंत्राटदारांमार्फत काम करणाऱ्या मजुरांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते संबंधित कंत्राटदारांनी उघडलेच नसल्याचा प्रकार समोर आला

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कंत्राटदारांमार्फत काम करणाऱ्या मजुरांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते संबंधित कंत्राटदारांनी उघडलेच नसल्याचा प्रकार समोर आला असून, कंत्राटदारांची ही लपवाछपवी प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर आता त्यांना ३१ आॅगस्टपर्यंत खाते उघडण्याची ताकीद देण्यात आली आहे़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रशासनाने २४ जुलै २०१५ च्या निर्णयानुसार हंगामी स्वरुपात कामावर मजूर न लावता ती कामे कंत्राटदारामार्फत करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार २०१५ मध्ये जवळपास ११५ कंत्राटदारांमार्फत कृषी विद्यापीठात मजुरांकडून काम करून घेण्यात आले तर २०१६ मध्ये ५४ कंत्राटदारांमार्फत कामे करून घेण्यात आली़ कामे करणाऱ्या प्रत्येक मजुराचे भविष्यनिर्वाह निधीचे खाते संबंधित कंत्राटदाराने उघडणे बंधनकारक आहे़ परंतु, गेल्या दोन वर्षांपासून या कंत्राटदारांनी एकाही मजुराचे भविष्यनिर्वाह निधीचे (पीएफ) खाते उघडलेले नाही़ त्यामुळे मजुरांच्या हक्काचा पैसा त्यांच्या खात्यात जमा झाला नाही़ शिवाय त्या पैशाच्या माध्यमातून मिळणारे व्याजही या मजुरांना गमवावे लागले आहे़ या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने दोन वर्षापूर्वी संबंधित कंत्राटदारांना कामे करण्याच्या अनुषंगाने नियम व अटींची लेखी स्वरुपात माहिती दिली होती़ परंतु, त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे प्रशासनाने पाहिले नाही़ परिणामी गेल्या दोन वर्षांपासून कंत्राटदारांनी पीएफचा निधी जमाच केला नाही़ ही बाब लक्षात आल्यानंतर आता विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या यादीवरील सर्व कंत्राटदारांना त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे पीएफचे खाते ३१ आॅगस्टपर्यंत उघडण्याचे आदेश दिले आहेत़ असे खाते न उघडल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे़ असे असले तरी गेले दोन वर्षे या कंत्राटदारांनी बुडविलेल्या पैशांचे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे़ दरम्यान, कृषी विद्यापीठात काही विभागांकडून तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची कामे निविदा न काढताच ती कंत्राटदारांना देण्यात आली़ काही मोठ्या विभागांमध्ये जवळपास ५० मजूर दररोज कामाला असतात़ लाखो रुपयांचे हे काम असताना त्याच्या निविदा काढण्याची तसदी विद्यापीठाकडून घेतली गेलेली नाही़