शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संविधान बचाव समितीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:38 IST

सीएए, एनआरसी कायदा रद्द करावा, यासह परभणीतील २० डिसेंबरच्या आंदोलन प्रकरणी १२ हजार जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या व अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी संविधान बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सीएए, एनआरसी कायदा रद्द करावा, यासह परभणीतील २० डिसेंबरच्या आंदोलन प्रकरणी १२ हजार जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या व अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी संविधान बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़केंद्र शासनाने लागू केलेला एनआरसी, सीएए कायदा रद्द करावा यासह २० डिसेंबर रोजी परभणी येथे आंदोलनानंतर घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी १२ हजार मोर्चेकऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, सुडबुद्धीने दाखल केलेले खटले रद्द करून अटक केलेल्या निरापराधांची तत्काळ सुटका करावी, या घटनेची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अधिकाराचा दुरुपयोग करणाºया पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांसाठी शहरातील शनिवार बाजार भागातून शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला़ अपना कॉर्नर, ग्रँड कॉर्नर, महात्मा ज्योतीबा फुले चौक परिसर मार्गे जिल्हा क्रीडा संकुलासमोर हा मोर्चा दाखल झाला़ येथे या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले़ यावेळी मौलाना रफियोद्दीन अशरफी, विजय वाकोडे, नितीन सावंत, डॉ़ धर्मराज चव्हाण, शिवाजी कदम, मुफ्ती मिर्झा कलीम बेग नदवी, मुजम्मील खान, अभय टाक, अ‍ॅड़ अफजल बेग आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ त्यानंतर या मोर्चाची सांगता झाली़ मोर्चाच्या यशस्वीतेसाठी शेख वसीम, अ़ करीम, मौलाना जहांगीर नदवी, डॉ़ सय्यद नजमूल हसन, शेख फाहेद शेख हमीद, अ‍ॅड़ जकी एकबाल सिद्दीकी, सिद्धार्थ कांबळे, खमर फुलारी आदींसह संविधान बचाव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले़ यावेळी पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला होता़मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांची भेट घेणार४यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी २५ जानेवारी रोजी पालकमंत्री नवाब मलिक परभणी दौºयावर येत आहेत़ यावेळी गुन्हे मागे घेण्याच्या अनुषंगाने त्यांची संविधान बचाव समितीच्या वतीने भेट घेण्यात येईल़४त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली जाईल, असे उपस्थितांना सांगण्यात आले़ संविधान बचाव समितीच्या वतीने यापुढेही एनआरसी, सीएए आदी कायद्यांना लोकशाही मार्गाने विरोध केला जाईल, असेही आपल्या भाषणात मान्यवरांनी सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन