शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

OBC विरोधात काँग्रेस अन् भाजप एकत्र, जानकरांनी सांगितली गोपीनाथ मुंडेंची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:04 IST

काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष ओबीसींना न्याय देऊ शकत नाहीत. भाजपचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध होता, पण त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला होता, अशी आठवण जानकर यांनी सांगितली.

ठळक मुद्देपरभणीतील एका मेळाव्याला रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी, काँग्रेस आणि भाजपवर त्यांनी टीका केली. 

परभणी - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे, ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आणि संघटनांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. ओबीसी समाजाचं राज्यातील 27 टक्के राजकीय आरक्षण रद्दबातल केल्यामुळे सध्या होत असलेल्या 105 नगरपंचायतींच्या निवडणुकीत ओसीबी समजाला स्थान नाही. त्यामुळे, विविध संघटना आणि नेते एकत्र येऊन मेळावे व बैठका घेत आहेत. परभणीतील एका मेळाव्याला रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी, काँग्रेस आणि भाजपवर त्यांनी टीका केली. 

काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष ओबीसींना न्याय देऊ शकत नाहीत. भाजपचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध होता, पण त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला होता, अशी आठवण जानकर यांनी सांगितली. ओबीसींचं आरक्षण जाण्याला काँग्रेस आणि भाजपा दोघेही जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महादेव जानकर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, जेव्हा कलम 340 आणि 341 लिहिलं गेलं तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी ओबीसी आरक्षणाला तमाम भारतीय जनता पक्षाचा विरोध होता. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला होता. भाजपात ओबीसीबाबत बोललं की संपवलं जातं, असा आरोपच जानकर यांनी केला.  आम्ही भाजपचे चेले नाहीत, किंवा काँग्रेसचे दलालही नाही. त्यामुळे, ओबीसींच्या बाबतीत आवाज उठविण्यासाठी केव्हाही तयार आहोत. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा ने देण्याचं काँग्रेस आणि भाजप यांनी एकत्रितपणे ठरवल्याचा आरोपही जानकर यांनी येथील मेळाव्यात बोलताना केला.  

टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडेOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणMahadev Jankarमहादेव जानकर