शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष, समस्यांमधूनच सापडतो यशाचा मार्ग- उज्ज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:11 IST

संघर्ष आणि समस्यांशी दोन हात करतानाच यशाचा खरा मार्ग सापडत असतो़ स्वत:मधील आत्मविश्वास संघर्ष करण्याची प्रेरणा देतो़ त्यामुळे संघर्षापासून दूर न जाता त्याचा सामना करायला शिका, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी अभियोक्ता पद्मश्री अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संघर्ष आणि समस्यांशी दोन हात करतानाच यशाचा खरा मार्ग सापडत असतो़ स्वत:मधील आत्मविश्वास संघर्ष करण्याची प्रेरणा देतो़ त्यामुळे संघर्षापासून दूर न जाता त्याचा सामना करायला शिका, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी अभियोक्ता पद्मश्री अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी केले़येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १७ नोव्हेंंबर रोजी ‘युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्यातील आव्हाने’ या विषयावर निकम बोेलत होते़ अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ़ अशोक ढवण तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, शिक्षण संचालक डॉ़ विलास पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले, कुलसचिव रणजीत पाटील, प्राचार्य डॉ़ धर्मराज गोखले आदींची उपस्थिती होती़जीवनात ज्ञानाची भूक पाहिजे़ तपश्चर्यने ज्ञान संपादन होते़ विद्यार्थ्यांनी बुद्धीचे सामर्थ्य ओळखले पाहिजे़, असे सांगून आपल्याकडे प्रामाणिकपणा असल्यास गुन्हेगारांच्या मनातही दबदबा निर्माण करू शकतो, असे ते म्हणाले़ महाविद्यालयातील रॅगिंगच्या प्रकारामुळे ग्रामीण विद्यार्थ्यामध्ये नैराश्य येते़ त्यामुळे नवप्रवेशित विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले़कार्यक्रमात कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांच्या हस्ते अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला़ तसेच विद्यापीठातील यशस्वी विद्यार्थी रुपेश बोबडे, रंगोली पडघन, प्रतीक्षा पवार, शैलेंद्र कटके, देवयानी शिंदे, मंजुषा कातकडे, शुभम राय यांचा अ‍ॅड़ निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ डॉ़ मृण्मयी भजक यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़ विलास पाटील यांनी आभार मानले़

टॅग्स :parabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठUjjwal Nikamउज्ज्वल निकम