शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांडक यांची लाड यांच्याविरोधात पोलिसात तक्रार; मानवतमध्ये कुरघोडीच्या राजकारणाचा नवा अध्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 18:13 IST

कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांना  कार्यालयात जाउन शिवीगाळकरुन धमकवल्या प्रकरणी डॉ. अंकुश लाड यांच्याविरोधात मंगळवारी (दि.२४ ) रात्री साडे अकराच्या सुमारास गुन्हा दाखल केला. 

मानवत (परभणी ) :  कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांना  कार्यालयात जाउन शिवीगाळकरुन धमकवल्या प्रकरणी डॉ. अंकुश लाड यांच्याविरोधात मंगळवारी (दि.२४ ) रात्री साडे अकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच पालिका निवडणूकीनंतर तब्बल दिड वर्षानंतर डॉ. अंकुश लाड आणि कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांच्यातील राजकीय वाद उफाळून आल्याचे चित्र समोर आले आहे. 

पालिका निवडणुकीच्या तोंडावर  डॉ. अंकुश लाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणुकीत १० नगरसेवकासह नगराध्यक्ष निवडून आणले. याचवेळी कॉंग्रेसचे बालकिशन चांडक यांनी प्रचारात डॉ. लाड यांनाच टार्गेट केल्याने ही पालिका निवडणूक चांगलीच गाजली होती. यावेळी पालिका नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गाला राखीव होते. निवडणुकीत शिवसेनेकडून शिवकन्या स्वामी या विजयी झाल्या.मात्र,  चांडक यांच्या गटाच्या माजी नगरसेवकाने स्वामी यांच्या जात प्रमाण पत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणी चांडक हेच याचिका करणाऱ्या माजी नगरसेवकाला रसद पुरवत असल्याचा आरोप लाड गटाकडून सतत केला जात होता.

याच प्रकरणातून झाला वाद या वादातुनच डॉ.लाड यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता चांडक यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही याचिकाकर्त्याला मदत करत आहात असे म्हणत शिवीगाळ करून धमकावले. यानंतर रात्री उशिरा चांडक यांनी डॉ. लाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाने चांडक - लाड हा राजकीय कुरघोडीचा संघर्ष उघड सुरु झाल्याची चर्चा शहरात आहे. 

माजी नगरसेवकाचाही तक्रार डॉ. लाड यांनी आपणास शिवीगाळ केल्याची तक्रार माजी नगरसेवक विजयकुमार दलाल यांनी पोलीस निरिक्षक प्रदीप पालिवाल यांना एका अर्जाद्वारे केली आहे. 

विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी प्रतिनिधी तथा माजी जिल्हा अध्यक्ष बालकिशन चांडक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे, धमकावुन व शिवीगाळ करुन विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही असे म्हटले आहे. यासोबतच पोलीस अधिक्षक दिलीप झळके यांनी लक्ष घालुन शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPoliticsराजकारणparabhaniपरभणी