शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा आनंद घेण्यासाठी आता महाबळेश्वर सोडा, परभणीला चला; तापमान थेट ६.६ अंशांवर!

By मारोती जुंबडे | Updated: December 8, 2025 11:53 IST

परभणीने 'थंडीत' महाबळेश्वरला मागे टाकले! दोन दिवसांपासून जिल्ह्यात 'हुडहुडी' कायम

परभणी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला असून पाऱ्याची घसरण चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. रविवारी नोंदवलेले ८ अंश सेल्सिअस तापमान सोमवारी सकाळी घटत थेट ६.६ अंशांवर स्थिरावले. हा पाऱ्याचा आकडा महाबळेश्वरच्या तापमानालाही मागे टाकणारा ठरला असून परभणीकर अक्षरशः गारठून गेले आहेत.

शहरात पहाटेपासून दाट धुके पसरत आहे. रस्ते, इमारती, वाहनांचे काच, झाडे–झुडपे पांढऱ्या धुक्याच्या चादरीत गुरफटल्यासारखे दिसत आहेत. सकाळी ७ नंतरही दृष्यमानता मर्यादित असल्याने वाहनधारकांना विशेष काळजीपूर्वक प्रवास करावा लागत आहे. पहाटे  थंडीपासून बचाव करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. थंडीच्या लाटेमुळे शहरातील दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम जाणवतो आहे. बाजारपेठा उशिरा सुरू होत आहेत, तर सकाळच्या सत्रात चहाच्या टपऱ्या, गरम दूध विक्रेत्यांपाशी मोठी उलाढाल होताना दिसत आहे. सध्या नागरिक गरम कपडे, मफलर, शॉल, टोपी यांची खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत.

दोन दिवसांपासून जिल्ह्यात 'हुडहुडी' कायमशनिवारपासूनच थंडीने जोर पकडला होता. त्यात रविवारी तापमान ८ अंशांवर आल्याने थंडीचा चटका वाढला. परंतु सोमवारी सकाळी ६.६ अंशांची नोंद झाल्याने थंडीची तीव्रता कमालीची वाढली. अचानक पडलेल्या गारठ्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारपण असलेले नागरिक अधिक त्रस्त झाले असून डॉक्टरांकडे रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

रब्बी पिकांवर थंडीचा फटकागेल्या आठवडाभरापासून तापमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. गहू, हरभरा, ज्वारी यासारख्या पिकांवर थंडीचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. शुक्रवारपर्यंत ११.२ अंशांवर असलेला पारा अवघ्या दोन दिवसांत ५ अंशांनी खाली येणे ही चिंतेची बाब असल्याचे शेतकरी व्यक्त करतात.

परभणीचा पारा महाबळेश्वरलाही मागे टाकणारासामान्यतः महाबळेश्वर येथे डिसेंबर महिन्यात ७–८ अंश तापमानाची नोंद होते. मात्र सोमवारी परभणीचे तापमान ६.६ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगली. आता महाबळेश्वर सोडा, थंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर परभणीला या, असे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील सात दिवसांतील तापमानातील मोठे चढ-उतारदिवस    तापमान (अंश सेल्सिअस)सोमवार    ८.४मंगळवार    ९.८बुधवार    ९गुरुवार    ११शुक्रवार    ११.२शनिवार    ९रविवार    ८सोमवार    ६.६

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani shivers as temperature plummets, colder than Mahabaleshwar!

Web Summary : Parbhani reels under intense cold wave, dropping to 6.6°C, surpassing Mahabaleshwar. Daily life is disrupted, impacting Rabi crops and causing health issues, with markets opening late and hot beverage sales soaring.
टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमानAgriculture Sectorशेती क्षेत्र