शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात थंडीची लाट; सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 12:36 IST

हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्याच्या तापमानात घट नोंद केली जात आहे.

ठळक मुद्देमंगळवारी ८.५ अंश आणि आज बुधवारी ८ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे.

परभणी : जिल्ह्यात थंडीची लाट सुरू झाली असून, सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात ९ अंशापेक्षा पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.

या वर्षीच्या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, जिल्ह्यातील सर्व प्रकल्प पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. याशिवाय भूजल पातळीमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या हिवाळ्यातही वातावरणात चांगलाच गारवा राहील, असा अंदाज यापूर्वीच बांधलेला होता. या अंदाजानुसार हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्याच्या तापमानात घट नोंद केली जात आहे. तीन दिवसांपासून तापमान घटले आहे. सोमवारी ८.८ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी ८.५ अंश आणि आज बुधवारी ८ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असून, नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. 

हिवाळ्यात आरोग्य संवर्धनासाठी नागरिक विशेष काळजी घेत असतात. त्यातूनच पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची संख्या आता वाढली आहे. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, राजगोपालाचारी उद्यान आणि  जिल्हा स्टेडियम परिसरात नागरिक मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकसाठी येत आहेत. एकंदर थंडीचा परिणाम जिल्ह्यातील जनजीवनावर जाणवू लागला आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत वातावरणात चांगलाच गारठा निर्माण होत असून, सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यांवरील वाहतूक विरळ होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीenvironmentपर्यावरणTemperatureतापमान