शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीकर थंडीने हुडहुडले, सलग दुसऱ्या दिवशी परभणी ८.० अंश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 19:18 IST

मराठवाड्यात १८ ते २४ व २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

परभणी : यंदा मागील वर्षीपेक्षा एक महिना आधीच किमान तापमान घटले आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ८ ते १० तारीख दरम्यान ८ अंश या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. यंदा सोमवारी परभणीचे किमान तापमान ८.० अंशाखाली आले आहे. रविवार तसेच सोमवारच्या घटलेल्या तापमानामुळे दोन दिवसांपासून थंडीची लाट कायम आहे.

परभणी शहरात यावर्षी हिवाळ्यात रविवारी सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्याचे दिसून आले. किमान तापमान ८.३ अंशांखाली आल्याने परभणीकर थंडीने हुडहुडले. मात्र, दुसऱ्या दिवशी या तापमानात ०.३ अंशाची घट झाली. त्यामुळे सोमवारी किमान तापमान ८ अंश झाले होते. परिणामी, थंडीच्या प्रभावाने जनजीवन विस्कळीत झाले. दोन दिवसांत परभणीकरांना गारठा जाणवण्यास सुरुवात झाली. यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दिसून आले. सकाळच्या वेळी विद्यापीठ परिसर, उद्यानात येणाऱ्यांची वर्दळही रोडावली होती. या थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी उबदार कपड्यांचा पेहराव केल्याचे दिसून आले. थंडीमुळे सकाळी तसेच रात्री रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसून येत आहे.

किमान तापमान वाढण्याची शक्यताप्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या प्राप्त अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये १८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या अंदाजानुसार दोन दिवसांत किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट होऊ शकते, असे कळविले होते. त्यानुसार घट झाल्याचे पाहावयास मिळाले. किमान तापमान २१ नोव्हेंबरपासून हळूहळू दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यात १८ ते २४ व २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

असे होते सात दिवसांतील किमान तापमान१५ नोव्हेंबर १२.०१६ नोव्हेंबर १०.७१७ नोव्हेंबर १११८ नोव्हेंबर १२.५१९ नोव्हेंबर १०.१२० नोव्हेंबर ८.३२१ नोव्हेंबर ८.०

टॅग्स :parabhaniपरभणी