शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"संविधानाला मानणाऱ्यांनी नेहमी..."; परभणीतल्या हिंसक आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:14 IST

परभणीत आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

CM Devendra Fandavis on Parbhani Violence :परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची माथेफिरूने तोडफोड केल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या बंदला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे दुपारनंतर शहरात जमावबंदी लागू करावी लागली. यावेळी आंदोलकांनी काही दुकानांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या काही गाड्यांवरही दगड फेकले. तसेच जाळपोळ केल्याचेही समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला अटक झाल्यानंतर हिंसा करणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

परभणीत दोन दिवसांपूर्वी एका माथेफिरूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाची तोडफोड केली होती. त्यानंतर या माथेफिरुला पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र बुधवारी या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणीत बंदची हाक देण्यात आली होती. या दरम्यान बंदला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकांनी काही दुकानांवर दगडफेक आणि जाळपोळ केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या हिंसक आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे आता शांतता असल्याचे म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीतून बोलत होते.

"परभणीत संविधानाच्या प्रतिमेसोबत माथेफिरुनी केलेल्या गोष्टीचा निषेधच केला पाहिजे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तो व्यक्ती माथेफिरू आहे. तो एक प्रकारचा मनोरुग्ण आहे. त्याला लगेच अटक झालेली आहे. अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होते हे काही योग्य नाही. जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्कारला पाहिजे. अटक झाल्यानंतर हिंसा करणे हे काही योग्य नाही. तिथे आता शांतता आहे. भविष्यातही शांतता राहावी असा आमचा प्रयत्न आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

परभणीत उद्रेक

बुधवारी परभणी येथे काळी कमान खानापूर फाटा याशिवाय कॅनॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंबेडकरी चळवळीतील समर्थकांनी टायर जाळून आंदोलनास सुरुवात केली होती. परभणी शहर बंदची हाक दिल्याने आज शहरातील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतर आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.  विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आले. आंदोलनास हिंसक वळण लागल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला.

दुसरीकडे, महिलांसह आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून खिडक्यांची तावदाने, खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच शहरात काही दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली.

टॅग्स :parabhaniपरभणीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसParbhani policeपरभणी पोलीस