शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे गव्हाची वाढ खुंटली; हरभराही घाटेअळीच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 18:59 IST

शेतकरी नवीन संकटात सापडला आहे़ 

ठळक मुद्देखरीप हंगामामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला़

पाथरी : परतीच्या पावसाने तालुक्यातील रबी हंगाम लांबणीवर पडल्याने या हंगामात अजूनही क्षमतेएवढा पेरा झाला नसला तरी सद्यस्थितीत गव्हाचे पीक पोटऱ्यात असून, ढगाळ वातावरणामुळे या पिकाची वाढ खुंटली आहे़ तर दुसरीकडे हरभऱ्याच्या पिकाला घाटेअळीने घेरले असून, शेतकरी नवीन संकटात सापडला आहे़ 

खरीप हंगामामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला़ त्यामुळे कापूस, सोयाबीन पिके हातची गेली़ हा पाऊस आॅक्टोबर महिन्यात झाल्याने रबीची पेरणीही लांबली़ पावसामुळे खराब झालेली शेत जमीन दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांचा बहुतांश वेळ गेला़ त्यामुळे यावर्षी तालुक्यात १६ हजार ११७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ प्रत्यक्षात रबीसाठी २४ हजार ८४९ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे़ त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली असून, हे पीकही आता अडचणीत सापडले आहे़ संपूर्ण हिवाळ्यामध्ये शेकोटी पेटवावी लागेल, अशी थंडी पडली नाही़ ढगाळ वातावरणामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे़ 

दुसरीकडे हरभऱ्याच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ विशेष म्हणजे अनेक भागांमध्ये अजूनही पेरणी केली जात आहे़ गव्हासाठी थंडी पोषक असते़ मात्र थंडी नसल्याने या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे़ सध्या पाथरी तालुक्यामध्ये गहू, पोटऱ्यात असून, त्या पुढे वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत़ महिनाभरापासून सतत ढगाळ वातावरण राहिल्याने गव्हाचा उतारा घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ 

प्रथमच वाढले   बाजरीचे क्षेत्ररबी हंगामामध्ये यावर्षी प्रथमच नवीन जातीच्या बाजरीची पेरणी करण्यात आली आहे़ जनावरांसाठी चारा म्हणून उपयुक्त असलेली बाजरी शेतकऱ्यांनी घेतली असून, हे पिकही बहरात आहे़ विशेष म्हणजे यावर्षी बाहेर जिल्ह्यातून बियाणे मागवून बाजरीची पेरणी करण्यात आली आहे़ त्यामुळे ज्वारी बरोबरच या भागात अनेक वर्षानंतर बाजरीचे उत्पादनही निघणार आहे़ 

ज्वारीचे पीक बहरलेगहू आणि हरभरा या दोन पिकांना वातावरणाचा फटका बसला असला तरी ज्वारीसाठी मात्र ढगाळ वातावरण पोषक ठरत आहे़ त्यामुळे ज्वारी बहरली आहे़ यावर्षी ज्वारीची पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली असून, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे़; परंतु, पेरणीला उशीर झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना त्याचाही फटका सहन करावा लागेल, अशी शक्यता आहे़ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीparabhaniपरभणी