शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजारांची लाच घेताना अव्वल कारकून चतुर्भूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 18:37 IST

जळालेल्या शेत आखाड्याची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मागितली लाच

पाथरी (परभणी ) : जळालेल्या शेत आखाड्याची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अव्वल कारकूनास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १८ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमासरा रंगेहाथ पकडले आहे. 

पाथरी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या आखाड्याला लाग लागून त्यात एक वासरु आणि शेती उपयोगी साहित्य जळाले होते. या  प्रकरणात नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून ज्ञानोबा सोनबा काळे हे ६ हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीवरुन १८ जुलै रोजी पाथरी तहसील कार्यालयात सापळा लावण्यात आला. त्यावेळी अव्वल कारकून ज्ञानोबा काळे यांनी तक्ररादार शेतकऱ्याकडून ६ हजार रुपयांची लाच मागणी करुन ती स्वीकारली. पथकातील अधिकाऱ्यांनी त्यास रंगेहाथ पकडले. 

या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाठकर, उपाधीक्षक एन.जे.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती, हवालदार मिलिंद हनुमंते, अनिरुद्ध कुलकर्णी, अविनाश पवार, सचिन धबडगे, जहागीरदार, शेख शकील, अनिल कटारे, शेख मुखीद, चट्टे, सारिका टेहरे, दंडवते, चौधरी, बोके यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसparabhaniपरभणी