शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

शहीदांच्या स्मृती जागविणारा चौक

By admin | Updated: August 9, 2014 00:29 IST

परभणी: शहीदांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी स्मृतीस्तंभ उभारण्यात आला

परभणी: शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या क्रांती चौकात शहीदांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी स्मृतीस्तंभ उभारण्यात आला असून, हुतात्म्यांच्या कार्याचे स्मरण देतानाच नव्या पिढीला स्फुर्ती मिळत आहे.मराठवाडा मुक्ती संग्रामात परभणी जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिले. निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी त्याकाळी अनेकांनी कारावास भोगला. अनेकांनी भूमिगत राहून लढा दिला. स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली माजी आ. आर. बी. देशपांडे, मुकुंदराव पेडगावकर, मनोहरराव खेडकर, श्रीनिवासराव बोरीकर, गोविंदराव नानल अशी किती तरी नावे घेता येतील ज्यांनी या लढ्यासाठी आपले सर्वस्व दिले. शहरातील क्रांती चौकातूनच या स्वातंत्र्य सैनिकांची रणनीती ठरायची. याच ठिकाणी योजना आखल्या जायच्या. विशेष म्हणजे याच चौकात बैठका झाल्या आणि याच चौकातून अनेकांना कारावासही भोगावा लागला. माजी आ. आर. बी. देशपांडे यांना येथूनच कारावासात जावे लागले होते. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात क्रांती चौकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या या आठवणी जागृत ठेवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण, अण्णासाहेब गव्हाणे यांच्या उपस्थितीत १९७६ मध्ये या ठिकाणी स्मृतीस्तंभ उभारण्यात आला. भाजी मार्केट परिसरात हा स्मृती स्तंभ असल्याने परिसर अस्वच्छ बनला होता. स्तंभाशेजारीच विक्रेते त्यांचे साहित्य ठेवत. त्यामुळे या स्मृती स्तंभाची अवहेलनाच होत होती. हा स्मृती स्तंभ म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या बलीदानाची आठवण करुन देणारा, क्रांतीच्या स्मृती तेवत ठेवणारा स्तंभ आहे. परंतु त्याच स्तंभाची दुरवस्था होत असल्याने येथील बालनाथ देशपांडे यांनी या चौकाचे आणि स्मृतीस्तंभाचे वैभव जपले जावे यासाठी एकाकी लढा दिला. शासन दरबारी या स्तंभाचे महत्त्व पटवून दिले. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुंबई येथील आयुक्तांना वेळोवेळी निवेदने देऊन आणि पाठपुरावा करुनही त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यामुळे बालनाथ देशपांडे यांनी स्तंभाच्या ठिकाणीच बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आणि उपोषणही सुरू केले. त्यानंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दखल या ठिकाणी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरच हे उपोषण मागे घेण्यात आले. सध्या हा स्मृती स्तंभ आणि चौकाचे सुशोभिकरण झाले असून, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम या स्तंभाच्या माध्यमातून होत आहे.