शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत बालविवाहाचे प्रमाण जास्त; पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात: रूपाली चाकणकर

By राजन मगरुळकर | Updated: October 1, 2022 15:15 IST

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली.

परभणी : जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण जास्त असल्याने पोलिस दलाने बालविवाह रोखण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करुन जनजागृती करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिल्या.

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, महिला व बालविकास विभाग अधिकारी कैलास तिडके, महिला व बालविकास अधिकारी विशाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

चाकणकर म्हणाल्या, बालविवाह ही सामाजिक समस्या आहे. बालविवाहामुळे मुलींचा पूर्ण विकास होण्यापूर्वीच त्यांच्यावर मातृत्वाची जबाबदारी येऊन पडते. बालविवाह रोखण्यासाठी पोलिस दलाने प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात. गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा वर्कर आणि अंगणवाडीताई यांच्या माध्यमातून होणारे बालविवाह रोखण्यात यावे. तसेच रविवारी आयोजित केलेल्या ग्रामसभेत बालविवाह रोखणे व विधवा प्रथा बंदीचा ठराव घेण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच पोलिस दलाच्या माध्यमातून जनजागृती करावी. पोलिस ठाण्यात कार्यरत भरोसा सेलच्या माध्यमातून पिडित महिलांना दिलासा देण्याचे काम करावे. पतीला किंवा सासरच्या लोकांना नोटीस देण्याचा कालावधी शक्य होईल तेवढा कमी करावा. तसेच नोटीस दिल्यावर संबंधित उपस्थित राहत नसेल, तर संबंधितावर तत्काळ गुन्हे दाखल करावेत. 

जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरणांच्या इमारतीमध्ये समुपदेशन केंद्र सुरु करुन त्याठिकाणी पिडीत महिलांचे समुपदेशन करावेत. भरोसा सेलकडे येणाऱ्या महिलांना किमान कौशल्य विकास विभाग किंवा माविमच्या सहकार्याने प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच महिला व बालविकास विभागाने अशा महिलांसाठी ‘स्वाधार गृह’ प्रस्ताव सादर करावेत. अध्यक्षा चाकणकर यांनी कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, बाल विवाह, पीसीपीएनडीटी व महिलांसंबंधी असलेल्या विविध प्रकरणांबाबत आढावा घेतला. भरोसा सेल, निर्भया पथक यांची देखील पाहणी केली. जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाने तयार केलेल्या पुस्तिकेचे विमोचन चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. बैठकीस महिला आणि पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.

या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते निर्भया पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला गाडेकर, शेख रहिमा, करुणा मालसमिंदर, त्रिवेणी चोपडे, अंतलका फुफाटे, किर्ती पानगे तर सिमा चाटे, शकुंतला एकाडे, वंदना चव्हाण, संघमित्रा होळकर, आशा लांडगे, शबाना शेख, नागेंद्र मोळके, कृष्णा मुंढे, संजय शेळके, मुकुंद लाड, मधुकर चट्टे आणि शिवाजी घुगे या कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीRupali Chakankarरुपाली चाकणकर