शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेडमध्ये चाईल्ड लाईनच्या टिमने प्रशासनाच्या मदतीने रोखला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 19:08 IST

वधु-वराच्या पालकांचे समुपदेशन करत बालविवाह रोखण्यात यश मिळविले

गंगाखेड: तालुक्यातील एका गावात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड लाईनच्या टिमला मिळाली. यावरून मंगळवारी ( दि. ७) जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची मदत चाईल्ड लाईनने वधु-वराच्या पालकांचे समुपदेशन करत बालविवाह रोखण्यात यश मिळविले. 

तालुक्यातील एका गावात दि. ७ मे मंगळवार रोजी सायंकाळी ५ वाजता १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती हेल्प लाईन नंबर १०९८ च्या माध्यमातून चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे यांना मिळाली. यानंतर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड येथील तहसीलदार स्वरूप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर यांच्या मदतीने जिल्हा महिला बाल विकास कार्यालयातील जिल्हा संरक्षण अधिकारी सुभाष कुलकर्णी, विधी सल्लागार बाळासाहेब सूर्यवंशी, समुपदेशक अनंता सोगे, ग्रामसेवक डी. एम. मुंडे, जमादार हरीभाऊ शिंदे, दत्तराव पडोळे यांच्या टिमने आज सकाळी गावास भेट देत तक्रारीची पडताळणी केली.

मुलीचे वय १५ वर्ष असल्याचे उघडकीस येताच चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे यांनी वधु वराच्या पालकांचे समुपदेशन केले. तसेच पालकांकडुन हमीपत्र लिहून घेत हा बालविवाह रोखण्यात यश मिळविले. यावेळी गंगाखेड महिला व बालविकास कार्यालयाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती एस.बी. वाघमारे, विस्तार अधिकारी प्रकाश होळंबे, पर्यवेक्षिका श्रीमती एन.एच. चव्हाण, गट समन्वयक महेश गौरशेटे यांनी गावाला भेट देवुन अल्पवयीन मुलींचे बालविवाह होऊ नये असे अवाहन केले.

अल्पवयीन मुलींचा बालविवाह करू नयेतालुक्यातील पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलींचा बालविवाह करू नये मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाची काही मदत हवी असल्यास प्रशासन आपल्या पाठीशी आहे असे सांगत ग्रामीण भागातील कुठल्याही गावात अल्पवयीन मुलीच्या बालविवाहचे प्रकार घडत असल्यास चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे अवाहन तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी लोकमतशी बोलतांना केले.

टॅग्स :parabhaniपरभणीmarriageलग्नParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी