शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'चंदाराणी मी तुझ्याकडे येतोय';पत्नी विरहात स्टेट्स अपडेट करत पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 18:32 IST

एक महिन्यांपूर्वी अपघातात पत्नीचा झाला मृत्यू

ठळक मुद्देसोशल मिडीयावर पत्नीसोबतचे फोटो स्टेट्सवर अपलोड केले नातेवाईकांच्या नावे लिहिला संदेश

गंगाखेड: 'चंदाराणी मी तुझ्याकडे येतोय' असे स्टेटस सोशल मीडियात अपडेट करून अपघाती निधन झालेल्या पत्नीच्या विरहात पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ९) सकाळी ९. ३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सार्थक संजय बचाटे ( २५ ) असे मृताचे नाव असून ही घटना वडगाव स्टेशन (ता. सोनपेठ)  शिवारात घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सार्थक संजय बचाटे हे पत्नी चंदा (२० ) सोबत गंगाखेडपासून जवळच असलेल्या वडगाव स्टेशन येथे राहत असत. १० फेब्रुवारीस सार्थक पत्नी चंदासोबत गंगाखेड येथून गावी वडगाव स्टेशनकडे दुचाकीवरून जात होते. यावेळी झालेल्या अपघातात चंदा यांचा मृत्यू झाला. या घटनेपासून सार्थक मानसिक तणावात होते. आज सकाळी घराबाहेरील शेतात त्याने गळफास घेतला. दरम्यान, सकाळी ८:५३ वाजता सार्थक याने सोशल मिडीयावर पत्नीच्या नावे चंदाराणी मी तुला भेटायला यायलो असे स्टेट्स अपडेट केले. तसेच पत्नीसोबतचे काही फोटो आणि 'आई, पप्पा, ताई, दाजी मला माफ करा. मी जायलो, भावांनो तुम्हाला आज सोडून जायलो, माझ्या मरणाला कोणीही जबाबदार नाही' असे स्टेटसही अपडेट केल्याचे आढळून आले आहे. 

सोशल मिडीयातील स्टेट्स मोबाईलवर पाहून सार्थकचे मित्र व नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली. सार्थक शेतात गेल्याचे समजताच सर्वांनी तिकडे धाव घेतली. यावेळी सार्थक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सार्थकचे चुलते जयप्रकाश हरिभाऊ बचाटे यांनी मित्र, नातेवाईक व ग्रामस्थांच्या त्याला तत्काळ गंगाखेड रुग्णालयात दाखल केले. मात्र निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देशमुख यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या घटनेबद्दल वडगाव स्टे. येथे हळहळ व्यक्त केली जात होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून याचा पुढील तपास सपोनि राजेश राठोड करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याparabhaniपरभणीmarriageलग्न