शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

नूतन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:17 IST

परभणी : येथील नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांची नियुक्ती राज्य शासनाने रद्द केली असून, परभणीतील नेत्यांनी ...

परभणी : येथील नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांची नियुक्ती राज्य शासनाने रद्द केली असून, परभणीतील नेत्यांनी यासाठी पणाला लावलेली प्रतिष्ठा फळाला आल्याचे दिसून येत आहे.

परभणी जिल्ह्यातील काही नेत्यांना कडक शिस्तीचे अधिकारी चालत नाहीत, हे आतापर्यंत अनेक वेळा दिसून आले आहे. आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना आणून हवे त्या पद्धतीने स्वहिताची कामे साधून घेण्याचा पायंडा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांना आणल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा संबंधितांसाठी राबविण्यात या अधिकाऱ्यांनी धन्यता मानल्याचेच दिसून आले आहे. दोन वर्षांपूर्वी परभणीच्या जिल्हाधिकारीपदी दीपक मुगळीकर यांची नियुक्ती झाली होती. मुगळीकर हे पदोन्नतीने जिल्हाधिकारी झाले होते. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात एकाही नेत्याने त्यांच्या कारभारात हस्तक्षेप केला नाही. ३१ जुलै रोजी ते सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी मुंबई येथील थेट आयएएस अधिकारी असलेल्या ऑचल गोयल यांची १५ दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे गोयल या २७ जुलै रोजीच परभणीत आल्या होत्या. शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम होता. ३१ जुलै रोजी दुपारनंतर त्यांना मावळते जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडून पदभार स्वीकारायचा होता, तसे त्यांच्या आदेशात नमूद केले होते. परंतु, गोयल या कडक शिस्तीच्या अधिकारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने जिल्ह्यातील काही नेते चांगलेच अस्वस्थ झाले. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून त्यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खटाटोप सुरू होता. काही नेत्यांनी मुंबईत यासाठी ठाण मांडले आणि राजकीय दबावातून शेवटी गोयल यांची नियुक्ती रद्द करण्याचा आदेश ३० जुलै रोजी रात्री प्रशासनास प्राप्त झाला. मुगळीकर यांनी त्यांचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना सोपवून सेवानिवृत्त व्हावे, असे सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे गोयल या शनिवारी पदभार न घेताच सायंकाळी मुंबईला रवाना झाल्या.

पालकमंत्री, विभागीय आयुक्तांचे कानांवर हात

या संदर्भात शनिवारी दुपारी पत्रकारांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी गोयल यांची नियुक्ती झाल्याचे माहिती आहे, परंतु, त्यांची नियुक्ती रद्द झाल्याचे माहिती नाही, असे सांगितले. याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारा, असे सांगून कानावर हात ठेवले.