शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कलेक्टर मॅडमचा पीए सांगून व्यापाऱ्याला गंडा; तीन पथके आरोपीच्या शोधात रवाना

By राजन मगरुळकर | Updated: April 28, 2023 16:27 IST

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत

परभणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानेच एका व्यापाऱ्याची फसवणूक करून त्याला रोख दोन लाख दहा हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून नानलपेठ ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आरोपीच्या शोधासाठी आता परभणी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत. त्यामुळे आरोपीची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

व्यापारी कैलास टिकमदास तुळसाणी यांनी गुरुवारी सायंकाळी फिर्याद नोंदविली. तुळसाणी यांनी आरोपी सुरेश वाघमारे नावाचा इसम याच्याविरुद्ध विश्वासघात करून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शोधासाठी तीन पथके रवाना केली. ज्यामध्ये दोन पथके स्थानिक गुन्हा शाखेची तर एक पथक नानलपेठ ठाण्याचे तपासासाठी रवाना झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

भामट्याने मागितले होते तीन लाख दहा हजारफिर्यादी तुळसाणी यांच्या दुकानावर आरोपी सुरेश वाघमारे हा गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास पोहोचला. त्याने कलेक्टर मॅडम यांना ईदनिमित्त ड्रेसचे वाटप करायचे आहे, यासाठी चांगले ड्रेस दाखवा, असे म्हणून व्यापाऱ्याशी संवाद साधला. त्यावर व्यापाऱ्याने तीन सॅम्पल ड्रेस काढले आणि सोबत दुकानातील एक कामगार संबंधितासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला. मुलाला सोबत घेऊन सदरील इसम जिल्हाधिकारी कार्यालयात आला. तेथे तो वेटिंग हॉलमध्ये बसला. काही वेळ दुकानातील मुलाला तेथे बसविले. यानंतर त्यातील ड्रेस घेऊन त्याने परिसरात फेरफटका मारून हे ड्रेस निश्चित झाले असून असे ४६ ड्रेस अजून काढा, असा निरोप संबंधित कामगार व व्यापाऱ्याला दिला व त्याचे बिल ९० हजार झाले असेल तर तुम्ही येताना सोबत तीन लाख दहा हजार घेऊन या. कारण जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा आहेत, त्याचे दोन बंडल असून त्या नोटा तुम्हाला दिल्या जातील, तुम्ही तुमच्याकडील पाचशेच्या नोटा असलेले तीन लाख दहा हजार रुपये घेऊन या, असे म्हणून भामट्याने व्यापाऱ्याला गळ घातला आणि पुढील फसवणुकीचा प्रकार घडला.

अरे जागेवरून उठा, मॅडम आल्यासदरील प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ज्यावेळेस घडला, त्यावेळेस जिल्हाधिकारी आंचल गोयल ह्या दुपारी कार्यालयात दाखल झाल्या. हीच बाब हेरून सदरील भामट्याने परिसरातील अभ्यांगत, नागरिक तसेच इतरांना जागेवरुन उठा, जिल्हाधिकारी मॅडम आल्या आहेत, असे म्हणून आपली ओळख असल्याचे व्यापारी, इतरांना भासविले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीला परिसरातील पीए यांच्या केबिनमध्ये बसवून सदरील आरोपी हा तुम्ही दिलेले पैसे मी मशीनवर मोजून येतो, तोपर्यंत इथेच थांबा, असे म्हणून तेथून बाहेर निघाला आणि यानंतर त्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून काढता पाय घेत पोबारा केला, असा हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

ड्रेस अन् राहणीमानाने तयार केली बनवाबनवीआरोपी नामे सुरेश वाघमारे यांनी परिधान केलेला ब्लेझर ड्रेस, हातातील घड्याळ, सूटबुटाचा पेहराव व्हीव्हीआयपी असल्यासारखा भासवून आपली सर्वांसोबत ओळख आहे, असा प्रकार सर्वांच्या समक्ष दाखवून देत त्याने बनाव रचत फसवणुक केल्याने कोणाला शंकाही आली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीfraudधोकेबाजी