नारायण राणे यांच्या वक्तव्याचा सेलूत शिवसेनेने तीव्र निषेध नोंदविला. २४ ऑगस्ट रोजी शहरातील क्रांती चौक भागात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करीत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बारहाते, राम पाटील, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रणजीत गजमल, रमेश डख, मंगलताई कथले, काशीनाथ घुमरे, नगरसेवक संदीप लहाने, मनिष कदम, अविनाश शेरे, सुधाकर पवार, जिजाभाऊ सोळंके, गौतम कनकुटे, अतुल डख, पवनराजे घुमरे, पांडुरंग कावळे, बंडू देवधर, संजय धापसे, श्याम मुंढे, अरुण ताठे, शक्ती बोराडे, गुलाब खेडेकर, संजय गायके, वैभव वैद्य, स्वप्निल डहाळे, सचिन चव्हाण, परमेश्वर वाघमोडे, माऊली राऊत, विनोद पाटील, दीपक यादव, तुकाराम मोहिते यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेलूत प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:23 IST