शहरातील आठवडी बाजार परिसरात शेख खालेक यांचे सायकल स्पेअर पार्ट व दुरुस्तीचे दुकान आहे. २९ मे रोजी शेख खालेक यांनी सकाळी सात वाजता दुकान उघडून अकरा वाजता ते बंद करून घरी गेले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास दुकानाला आग लागल्याची माहिती फोनवरून त्यांच्या मित्रांनी दिली. घटनास्थळावर गेल्यानंतर शेख खालेक यांनी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने आग विझविल्यानंतर दुकानात जाऊन पाहिले असता दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते; मात्र दुकानात असलेली ऐअर कॉम्प्रेशन मशीनवरील ३० हजार रुपये किमतीची ५ एचपी मोटार कुणीतरी चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून चोरून नेल्याचे समोर आले. मशीन चोरून नेल्यानंतर मशीनच्या वायर मोकळ्या राहिल्याने शॉर्टसर्किट होऊन दुकानाला आग लागल्याने दुकानातील टायर ट्यूब व इतर स्पेअरपार्टचे साहित्य जळून खाक झाल्याने दीड लाख रुपयाचे नुकसान झाल्याची तक्रार शेख खालेक यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
मानवत येथील आठवडी बाजार परिसरात असलेल्या सायकल स्पेअरपार्ट दुकानाला आग लागून दुकान जळून खाक झाले.