लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील जुना पेडगावरोड परिसरातील वैभवनगर भागात गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करीत कपाटातील १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाख रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परभणी शहरातील वैभवनगर भागात रमेश दत्तात्रय पामे यांचे घर आहे. गुरुवारी रमेश पामे यांचा मुलगा योगेश पामे याचा शहरातील काही व्यक्तींसोबत वाद झाला होता. त्यामुळे पामे कुटुंबीय नातेवाईकाच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री पामे यांच्या घराच्या संरक्षण भिंतीवरुन घर परिसरात प्रवेश केला व घराच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून खिडकीची एक बाजू काढली. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करुन बेडरुममधील कपाटातील रोख अडीच लाख रुपये व १५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पामे कुटुंबीय घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी नानलपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने घरापासून जिंतूररोडपर्यंतचा माग काढला. तेथून पुढे श्वान घुटमळले. या प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोनि.रामराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. दरम्यान, शहरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.शेजाºयाच्या घराला लावल्या कड्या४अज्ञात चोरट्यांनी पामे यांचे घर फोडण्यापूर्वी त्यांच्या शेजारी असलेले संजय सुरवसे यांच्या घराच्या दरवाजांना बाहेरुन कड्या लावल्या. त्यानंतर पामे यांच्या घरात जावून चोरी केली. सकाळी सुरवसे कुटुंबीय दरवाजा उघडत असताना बाहेरुन कडी असल्याने तो उघडला गेला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाºयांना आवाज दिला. शेजाºयांनी येऊन त्यांच्या घराची कडी उघडली.
साडे सहा लाख रुपयांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:32 IST