शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात बीडीओंविरूद्ध पुकारले बहिष्कार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:29 IST

येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांविरूद्ध ग्रामसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पंचायत समितीतील अधिकारी विरूद्ध ग्रामसेवकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांविरूद्ध ग्रामसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पंचायत समितीतील अधिकारी विरूद्ध ग्रामसेवकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे़पूर्णा पंचायत समिती अंतर्गत ७९ ग्रामपंचायती असून, ५४ ग्रामसेवक कार्यरत आहेत़ मागील काही महिन्यांपासून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरवसे यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामसेवकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती़ शनिवारी ग्रामसेवकांच्या संघटनेने गटविकास अधिकाºयांविरूद्ध तक्रार अर्ज दिल्याने हा वाद चव्हाट्यावर आला आहे़ या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सवडे यांनाही निवेदन पाठविले आहे़ गटविकास अधिकारी आरेरावीची भाषा वापरून ग्रामसेवकांना दमदाटी करतात़ काही तक्रारी घेऊन गटविकास अधिकाºयांकडे गेल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याची धमकी दिली जाते़ विकासकामांच्या प्रस्तावात उणिवा काढून ही कामे स्वत:च्या मर्जीप्रमाणे करून घेतात, असे आरोप ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाºयांनी केले आहेत़ गटविकास अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामसेवक त्रस्त असून, गटविकास अधिकाºयांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एऩए़ देसाई, उपाध्यक्ष के़एम़ भुसारे, सचिव आऱएस़ शिंदे, तुकाराम साखरे, केशव जवंजाळ आदींनी केली आहे़ग्रामसेवक संघटनेने या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सविस्तर निवेदन दिले असून, त्यात अनेक आरोप केले आहेत़ या सर्व प्रकरणावर गटविकास अधिकाºयांची वरिष्ठस्तरावरून चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली असून, ही चौकशी पूर्ण होईपर्यंत पंचायत समितीस्तरावर होणाºया मासिक व अर्धमासिक बैठकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे़ ग्रामसेवकांच्या या पवित्र्यामुळे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे़ एकंदर या प्रकरणामुळे विकास कामांनाही खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे़