शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत बर्ड फ्लू; मुरुंबा येथील पोल्ट्रीफार्ममधील २७ जणांचे घेतले स्वॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:43 IST

Bird Flu : मुरुंबा येथे बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत.

ठळक मुद्देदोघांचे रक्तजल नमुने घेतलेघाबरु नका, काळजी घ्या

परभणी : तालुक्यातील मुरुंबा येथे बर्ड फ्लूमुळे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने सोमवारी गावात दाखल होऊन पोल्ट्रीफॉर्म चालक व मालक अशा २७ जणांचे स्वॅब नमुने घेतले असून, ते पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.

मुरुंबा येथे बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. सोमवारी सकाळी आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा हिवताप विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे गावात जलद सर्वेक्षण करण्यात आले. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे एक पथक गावात ठाण मांडून असून, दररोज दहा दिवस नागरिकांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्याचप्रमाणे तापीच्या रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात आले असून, या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गावात बॅरिकेटस्‌ लावून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थांचा एक व्हॉटस्‌ॲप ग्रुप तयार करण्यात आला असून, संशयित रुग्णांना लक्षणे दिसल्यास तत्काळ माहिती कळविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गावात थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटरच्या साह्याने तपासणी करुन सारी, आयएलआयचे रुग्ण शोधण्याचे काम केले जाणार आहे.

दोघांचे रक्तजल नमुने घेतलेगावातील दोन रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असून, ते हिवताप व डेंग्यूच्या तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जिल्हा हिवताप कार्यालयाने गावात सवर्क्षेण केले आहे. या पथकाने ९ जानेवारी रोजी ५२ घरांना भेट देऊन पाहणी केली. त्यात ३ दूषित भांडी आढळली. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकानेही ९ व १० जानेवारी रोजी गावात कंटेनर सर्व्हे केला आहे. त्यात ५१८ भांड्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ७ दूषित भांडे आढळले. गावात ३.१९ आणि १० जानेवारी रोजी १.३३ हाऊस इंडेक्स आढळल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

घाबरु नका, काळजी घ्याबर्ड फ्लू हा आजार पक्ष्यांमधून मानवाला होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये. आरोग्य विभाग, हिवताप विभाग आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकारी- कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून राहणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळली तर आरोग्य अधिकाऱ्यांना तत्काळ कळवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी. देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीBird Fluबर्ड फ्लू