शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

विद्यापीठात जैविक रसायन विक्रीतून कमाई कोट्यवधींची; जीएसटीचा मात्र विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 19:02 IST

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती विकृतीशास्त्र विभागामार्फत बायोमिक्स नावाचे जैव रसायन शेतकऱ्यांना विक्री केले जाते.

- अभिमन्यू कांबळे

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विकृतीशास्त्र विभागामार्फत शेतकऱ्यांना गेल्या १४ वर्षांत कोट्यवधी रुपयांचे बायोमिक्स जैविक रसायन विक्री करण्यात आले. परंतु, त्यासाठी शासनाला द्यावा लागणारा जीएसटी व अन्य कर भरण्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती विकृतीशास्त्र विभागामार्फत बायोमिक्स नावाचे जैव रसायन शेतकऱ्यांना विक्री केले जाते. हे हळद, आद्रक आदी पिकांसाठी उपयुक्त असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. त्यामुळे या जैव रसायनाला अधिक प्रमाणात मागणी आहे. जैव रसायनाच्या एका किलोची बॅग ३०० रुपयांना शेतकऱ्यांना देण्यात येते. हे जैव रसायन बनविण्यासाठी दरवर्षी सध्याच्या दरानुसार अंदाजे ८ ते १० लाख रुपयांचा कच्चा माल कृषी विद्यापीठ बाजारातून खरेदी करते. (विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून शहरातील एकाच दुकानातून निविदा न काढता विद्यापीठाकडून हा कच्चा माल खरेदी केला जात आहे.) त्यानंतर तयार केलेले जैव रसायन विक्री करीत असताना त्यावरील वस्तू व सेवा कर शासनाला देणे बंधनकारक आहे. असे असतानाही विद्यापीठ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

२००७-०८ पासून हे जैव रसायन विक्री करण्यात येत आहे. आतापर्यंत ८ कोटी ७५ लाख २४ हजार ७८० रुपयांच्या बायोमिक्स जैविक रसायनाची कृषी विद्यापीठाने विक्री केली आहे. त्यामध्ये २००७-०८ मध्ये २ लाख २६ हजार ९५० रुपये, २००८-०९ मध्ये २ लाख ११ हजार ८५० रुपये, २००९-१० मध्ये १ लाख ६७ हजार ६५० रुपये, २०१०-११ मध्ये २ लाख ९ हजार ९०० रुपये, २०११-१२ मध्ये २ लाख ४० हजार ४५० रुपये, २०१२-१३ मध्ये ५ लाख ७० हजार ५५० रुपये, २०१३-१४ मध्ये ७ लाख ६१ हजार ८०० रुपये, २०१४-१५ मध्ये ७ लाख २६ हजार, २०१५-१६ मध्ये १५ लाख ९७ हजार ९५० रुपये, २०१६-१७ मध्ये ४६ लाख २४ हजार ६०० रुपये, २०१७-१८ मध्ये ६३ लाख ६५ हजार १०० रुपये, २०१८-१९ मध्ये १ कोटी ४१ लाख ४१ हजार ९९८ रुपये, २०१९-२० मध्ये २ कोटी २५ लाख रुपये आणि २०२०-२१ या वर्षात जवळपास ३ कोटी ५० लाख रुपयांच्या बायोमिक्स जैव रसायनाची विक्री करण्यात आली आहे.

कोट्यवधी रुपयांचे बायोमिक्स रसायन गेल्या काही वर्षांत कृषी विद्यापीठाने विक्री करूनही यातून मिळणाऱ्या नफ्यावरील कर शासनाकडे भरण्यास विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष का केले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या लेखापरीक्षणात ही बाब समोर कशी काय आली नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

कच्चा मालाची एकाच दुकानातून खरेदी बायोमिक्स जैविक रसायन तयार कण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची विद्यापीठाकडून परभणी शहरातील एकाच दुकानातून सातत्याने खरेदी करण्यात येत असल्याचे समजते. दरवषी हे जैव रसायन बनवण्यासाठी ८ ते १० लाख रुपयांचा कच्चा माल लागतो. यासाठी निविदाही काढण्यात आल्या नसल्याचे समजते. 

१ एप्रिल २०२२ पासून  जीएसटी भरण्यात येईलबायोमिक्स जैव रसायनाचा जीएसटी यादीत समावेश नाही. सद्यस्थितीत प्रायोगिक तत्वावर हे जैव रसायन विक्री केले जात आहे. यासाठी जीएसटी किती लागतो व अन्य बाबींवर संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे. १ एप्रिल २०२२ पासून यासाठीचा जीएसटी भरण्यात येईल. - डॉ. कल्याण आपेट, विभाग प्रमुख, वनस्पती विकृतीशास्त्र विभाग 

टॅग्स :GSTजीएसटीparabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ