शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
3
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
4
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
5
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
6
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
7
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
8
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
9
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 
10
१ नोव्हेंबरपासून बदलणार नियम! आता बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार एकापेक्षा अधिक 'वारस'दार, जाणून घ्या
11
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
12
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
13
दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
VIRAL VIDEO : वय केवळ आकडाच! ८२ वर्षांच्या आजीने केली भारतातील सगळ्यात उंच बंजी जम्पिंग; पाहून अंगावर येतील शहारे
15
'या' आयपीओचं बंपर लिस्टिंग! पहिल्याच दिवशी ९ टक्क्यांचा नफा, गुंतवणूकदार मालामाल
16
Budh Gochar 2025: २४ ऑक्टोबर बुध गोचर; १० नोव्हेंबरपर्यंत 'वृश्चिक' राशीच्या लोकांनी घ्या 'ही' काळजी!
17
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
18
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
19
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
20
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?

परभणीतील बसपोर्टचे आज भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 23:53 IST

एअरपोर्टच्या धर्तीवर परभणीत बसपोर्ट उभारले जात असून १४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एअरपोर्टच्या धर्तीवर परभणीत बसपोर्ट उभारले जात असून १४ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे.शहरातील बसस्थानकाची इमारत जुनी झाल्याने या ठिकाणी अद्ययावत असे बसस्थानक उभारावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार बसपोर्ट उभारणीसाठी रावते यांनी निधी मंजूर करुन दिला. गुरुवारी या कामास सुरुवात होणार आहे. सकाळी १० वाजता नूतन इमारतीचे भूमिपूजन रावते यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला राठोड, खा.बंडू जाधव, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.रामराव वडकुते, आ.बिप्लव बजोरिया, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, आ.मोहन फड, महापौर मीनाताई वरपूडकर, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, मनपा आयुक्त रमेश पवार यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आ.डॉ.राहुल पाटील, विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी केले आहे.१३ कोटींचा निधी मंजूर४नवीन बसपोर्टच्या उभारणीसाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी १३ कोटी ४ लाख, ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नवीन बसस्थानकाच्या प्रारुप आराखड्यात अद्ययावत असे १६ गाळे.४ दोन अनलोडींग प्लॅटफॉर्म, इमारतीच्या दोन्ही बाजुस प्रसाधनगृह, उपहारगृह, ९ व्यापारी गाळे, स्वतंत्र पोलीस. हिरकणी कक्ष, पार्सल कक्ष, जेनरिक मेडिकल, नियंत्रण कक्ष, एटीएम.४ आरक्षण कक्ष, प्रतीक्षालय, महिला वाहक-चालकांसाठी विश्रांतीगृह, वाहनतळ, सुरक्षा कक्ष आदी सुविधा राहतील. पहिल्या मजल्यावर पुरुष वाहक-चालकांसाठी विश्रांतीगृह, बहुउद्देशीय सभागृह. ८ विश्रांतीगृह, व्यायामशाळा.४ पुरुष शयनगृह आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दोन वर्षाच्या मुदतीत ही इमारत बांधली जाणार असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportएसटी