शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रबी पेरण्यांना सुरुवात; परभणी जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर जमिनीवर ज्वारीच्या पेरणीचे नियोजन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 12:59 IST

जिल्ह्यात यावर्षी अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांना याचा फटका बसला आहे

ठळक मुद्देपावसामुळे उत्पन्न वाढीची शक्यता

परभणी : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने १ लाख १६ हजार ४१९ हेक्टर जमिनीवर रब्बी हंगामाअंतर्गत ज्वारीची पेरणी होण्याचे नियोजन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सद्यस्थितीत पेरण्यांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात यावर्षी अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांना याचा फटका बसला असला तरी रब्बी हंगामात झालेल्या पावसाचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली आहे. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात १ लाख १६ हजार ४१९ हेक्टर जमिनीवर ज्वारीच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. तर २८ हजार ५७१ जमिनीवर गव्हाची लागवड करण्याचे कृषी विभागाने निश्चित केले आहे.

विशेष म्हणजे, यावर्षी चांगला पाऊस झाल्याने जमिनीमध्ये ओलही अधिक आहे. शिवाय विहीर व बोअर पाणीही चांगले आहे. त्यामुळे गव्हाच्या पिकासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यात ६३ हजार ६६३ हेक्टर जमिनीवर हरभऱ्याची पेरणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हरभऱ्याचा बाजारात मिळणारा चांगला भाव पाहता या पिकाच्या पेरणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. या शिवाय रब्बीतील इतर पिकांमध्ये ३ हजार ४९४ हेक्टरवर करडई, ११६ हेक्टरवर जवस, मका २६२८, १७ हेक्टरवर तीळ, ४८ हेक्टरवर सूर्यफूल तर ३ हजार ८३४ हेक्टरवर गळीत धान्याची लागवड होण्याची शक्यता आहे.

२ लाख १५ हजार हेक्टरवर रबीच्या पेरणीची शक्यताकृषी विभागाने जिल्ह्यात २ लाख १५ हजार ९९१ हेक्टर जमिनीवर रबी हंगामातील पिकांची पेरणी होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभी बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातही काही शेतकऱ्यांना फटका बसला. अतिवृष्टी व पूरपरिस्थतीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नदी, ओढे व सखल भागातील जमिनी  अनुउत्पादक राहिल्या. रब्बीत या जमिनीचा पेरणीसाठी वापर होणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने निश्चित केलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक जमिनीवर पेरा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणीagricultureशेती