शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेलूतील केळीची आखाती देशात गोडी; शेतकरी, व्यापाऱ्यांना अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 19:49 IST

परभणी जिल्ह्यातील सेलू बनले निर्यात केंद्र

- मोहन बोराडेसेलू (जि. परभणी) : आरोग्याच्या दृष्टिकोनातून केळीला सर्वच जण प्राधान्य देतात. त्यामुळे केळीची जून ते फेब्रुवारी या हंगामात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मुबलक पाणी उपलब्ध असणारे शेतकरी केळी बागेकडे वळले असून, सेलू परिसरातील केळी देशभरासह आखाती देशात निर्यात होत आहे.

तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राजवळ आणि शहराच्या काही अंतरावर लागून असलेल्या सातोना, सालगाव, उस्मानपूर या परिसरात निम्न दुधना प्रकल्पाचे बॅक वॉटर पसरलेले आहे. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध असल्याने या परिसरातील बागायतदार शेतकरी केळी बागेकडे वळले, तसेच तालुक्यातील आडगाव, कुपटा, तांदुळवाडी, गुळखंड, कान्हड, हट्टा, हादगाव परिसरातील शेतकरी केळीचे पीक घेत आहेत. तालुक्यातील शिंदे टाकळी येथील शेतकरी इंदरराव पवार यांनी एक एकर १० गुंठे क्षेत्रावर जवळपास १७०० केळी रोपांची लागवडी केली. उपलब्ध पाण्याचे ठिबकद्वारे योग्य नियोजन करून वेळेवर खताचा वापर केला.

केळी रोपे लागवड केल्यानंतर ८ महिन्यांत कमळ बाहेर पडते. त्यानंतर तीन ते चार महिन्यांत फळ परिपक्व होते. जवळपास बारा ते तेरा महिन्यांनी केळीचे पीक हाती येते. पवार यांना केळी लागवडीसाठी एक ते दीड लाख रुपयाचा खर्च लागला. त्यांनी आपला केळीचा बाग ठोक व्यापाऱ्यांना साडेतीन लाख रुपयांना विकला, तसेच त्याचे बेणेदेखील विकून केळी पिकातून निव्वळ दोन लाखांहून अधिक नफा मिळवल्याचे शेतकरी पवार यांनी सांगितले. दरम्यान, पारंपरिक शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. सद्य:स्थितीत मिळत असलेल्या भावामुळे लागवड खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असलेले शेतकरी योग्य नियोजन करून वेळेवर खत व निगराणी करून केळी उत्पादनातून चांगला नफा मिळवत आहेत.

शेतकरी व व्यापाऱ्यांना फायदासेलू तालुक्यासह परिसरात बागायतदार शेतकरी केळीचे उत्पादन घेत आहेत. केळीचा बागेतील केळी ठोक पद्धतीने खरेदी केली जाते. येथील केळीला देशभरासह आखाती देशात मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरातून दररोज सोलापूर येथे वीस टन माल ट्रकद्वारे पाठवला जातो. तेथून देशातील विविध महानगरांत व इराण, इराक, मलेशिया व दुबई आदी देशांत केळी निर्यात होत आहे. शहरातून १३ किलो बाॅक्सची व्यवस्थित पॅकींग करून माल परदेशात निर्यात केला जात आहे. सद्य:स्थितीत चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसह विक्रेत्यांना दोन पैसे मिळत आहेत. केळीसाठी मनुष्यबळ लागते. त्यामुळे शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे.- रईस बागवान, ठोक विक्रेते, सेलू.

टॅग्स :parabhaniपरभणीBananaकेळीAgriculture Sectorशेती क्षेत्र