शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:20 IST

अहमदाबाद येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या परिवर्तन यात्रेतील कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करुन राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अहमदाबाद येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या परिवर्तन यात्रेतील कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करुन राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हा कचेरीसमोर सकाळी ११ वाजेपासून बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनास प्रारंभ केला. बहुजन क्रांती मोर्चाद्वारे एस़सी़, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांविषयी जनजागृती केली जाते. या अंतर्गत देशभरात परिवर्तन यात्रा काढण्यात आल्या. २२ आॅक्टोबर रोजी अहमदाबाद येथे या यात्रेचा समारोपीय कार्यक्रम आयोजित केला होता. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला. त्यात अनेक कायकर्ते जखमी झाले. राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांना अटक केली होती. याच्या निषेधार्थ परभणीत हे धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा संयोजक लखन चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन