शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बाबाजानी दुर्राणींचा विधानपरिषदेचा संपतोय कार्यकाळ; राजेश विटेकरांच्या नावाची चर्चा !

By ज्ञानेश्वर भाले | Updated: June 20, 2024 16:41 IST

विधान परिषदेची बदलती राजकीय समीकरणे

परभणी : विधान परिषदेत रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यात परभणीतील आमदार बाबाजानी दुर्राणी यांचाही कार्यकाळ संपत असल्याने आता कोणाची वर्णी लागणार यावर तर्कविर्तक लावण्यात येत आहे. बदलत्या राजकीय घडामोडीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या जागेवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून पक्ष पातळीवर त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. लोकसभेतील रिंगणातून पक्षाने सांगितल्यानुसार घेतलेली माघार आणि आजपर्यंतच्या कामगिरीच्या बळावर विटेकरांना आमदारकीची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा सध्या रंगत आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फोडाफाडीच्या राजकारणानंतर होत असलेल्या या विधान परिषदेवरील ११ आमदारांची निवड प्रक्रिया अत्यंत वेगळ्या वळणावर आली आहे. यात विधान परिषदेवरील परभणीतील आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा समावेश असून त्यांचा कार्यकाळ २७ जूनला संपत आहे. सलग दोन वेळा विधानपरिषदेवर आमदार झाल्यानंतर तिसऱ्यांदा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांकडून वर्णी लागण्याच्या आशा जवळपास मावळल्याची स्थिती आहेत. त्यामुळे त्यांनी गत काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपली रणनीती आखली असून त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.

लोकसभा निवडणुकीत परभणीची जागा महायुतीने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली होती. मात्र तडजोडीच्या राजकारणात राष्ट्रवादीने ही जागा रासपाला सोडल्याने ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून विटेकरांना माघार घ्यावी लागली होती. पक्षाने घेतलेल्या निर्णयात विटेकरांनी आपली सहमती दर्शवल्याने निश्चितच आगामी काळात त्यांना आमदार करू असे, आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीतील सभेत त्यांना दिले होते. त्यामुळे अजित पवारांचे संबंधित आश्वासन विधान परिषदेच्या निवडणुकीतून खरे ठरणार असल्याची स्थिती आहेत. त्यामुळे बाबाजानी दुर्राणी यांचा विधान परिषदेवरील आमदारकीचा कार्यकाळ संपत असल्याने या माध्यमातून विटेकरांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

विधानसभेच्या दृष्टीने तयारीगत बारा वर्षांपासून मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधान परिषदेवर आमदार म्हणून कार्यरत आहे. पक्षाकडून मला आतापर्यंत महत्त्वपूर्ण पदे आणि प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळे मी आता विधान परिषद नव्हे तर विधानसभेच्या दृष्टीने तयारी करत असून पाथरी मतदारसंघातून लढणार आहे.- बाबाजानी दुर्राणी, विधान परिषदेवरील आमदार

आश्वासनाची पूर्तता होईलआजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार कामे केली. लोकसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारी असतानासुद्धा ऐनवेळी पक्षाने सांगितल्यानंतर माघार घेतली. त्यामुळे निश्चितच आजपर्यंतच्या कामासह मला मिळालेल्या आश्वासनाची पूर्तता आगामी काळात हाेईल.- राजेश विटेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसparabhaniपरभणीVidhan Parishadविधान परिषद