शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

पुरस्कारप्राप्त शेतकरी आता होणार लखपती; ७५ हजारांवरून थेट ३ लाख रुपये मिळणार

By हरी मोकाशे | Updated: February 9, 2024 18:42 IST

राज्यात दरवर्षी शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.

- मारोती जुमडे

परभणी : शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत सन्मानित करण्यात येते. परंतु, या पुरस्कारानिमित्त देण्यात येणारी रक्कम ही तूटपुंजी होती. मात्र, आता ७ फेब्रुवारी रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाने यामध्ये थेट तीन पटीने वाढ केली आहे. त्यामुळे आता पुरस्कार मिळणारा शेतकरी थेट लखपती होणार आहे.

शेती क्षेत्रामध्ये दरवर्षी होणाऱ्या अमुलाग्र बदलामध्ये ज्या शेतकऱ्यांचा मोठा वाटा असतो. त्यांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने राज्यात दरवर्षी शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण सेंद्रिय शेती, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कारांचा समावेश राज्य शासनाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र, या पुरस्कारांची मिळणारी रक्कम ही पुरस्कार स्वीकारण्यास जाणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना परवडणारी नव्हती.

त्यामुळे कुठेतरी या पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ व्हावी, यासाठी मागील काही वर्षांपासून मागणी सुरू होती. परंतु, आता ही मागणी राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. यापुढे आता शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास राज्य शासनाकडून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये तीन ते चार पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुरस्कार मिळालेला शेतकरी आता थेट कृषी विभागाच्या मदतीने लखपती होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने ७ फेब्रुवारी रोजी काढला आहे.

७५ हजारांवरून थेट ३ लाख मिळणारकृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये अकरा बाबींचा समावेश करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा राज्यातून एकाला देण्यात येतो. यामध्ये आतापर्यंत पुरस्कार विजेत्याला ७५ हजार रुपयांची रक्कम देण्यात येत होती. परंतु, नव्या शासन निर्णयानुसार संबंधित प्रगतशील शेतकऱ्याला तीन लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे पुरस्कारप्राप्त शेतकरी थेट लखपती होणार आहे.

दरवर्षी १०३ शेतकऱ्यांना दिला जातो पुरस्कारशेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे, हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेगवेगळे होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरूप योग्यवेळी पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक साह्य व सोयी सुविधा पुरविणे गरजेचे आहे. या सर्व बाबी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या वतीने ११ घटकांतर्गत वर्षभरात जवळपास १०३ शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जातो. यामध्ये सर्वाधिक वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार म्हणून ३४ जणांना दिला जातो, तर त्यानंतर युवा शेतकरी पुरस्कारासह इतर शेतकऱ्यांनाही या पुरस्काराचे वितरण केले जाते. यामध्ये आता शेतकऱ्यांना तीन लाखापासून ते एक लाख रुपयांपर्यंत पुरस्काराची रक्कम मिळणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीparabhaniपरभणी