शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत पार पडली कलावंत जागृती परिषद :लोककलावंत सोयी-सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:56 IST

सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवणाऱ्या लोककलावंतांना शासन, प्रशासन मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप यशवंत मकरंद यांनी केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवणाऱ्या लोककलावंतांना शासन, प्रशासन मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप यशवंत मकरंद यांनी केला़येथील महात्मा फुले कॉलनीतील सभागृहात लोककलावंत सांस्कृतिक मंच आणि युगंधर फाऊंडेशनच्या वतीने लोककलावंत जागृती परिषदेत मकरंद बोलत होते़ ते म्हणाले, महापुरुषांचा विचार, वारसा जोपासणारे, प्रबोधन आणि न्याय हक्कांचा आवाज बुलंद करणारे लोककलावंत हे खºया अर्थाने विचार वाहक आहेत़ यावेळी शाहीर नामदेव लहाडे, मदन कदम, भारत मुंजे, रमेश काटे, अजमत खान, शिवाजी सुगंधे, शिवाजी धबाले, प्रा़ अरुण पडघन, उत्तमराव गायकवाड आदींची भाषणे झाली़ युगांधर फाऊंडेशनचे संजीव अढागळे यांनी प्रास्ताविक केले़ लक्ष्मण डंबाळे यांनी आभार मानले़ या परिषदेत गायक, कवी, गोंधळी, नाट्यकलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते़ या परिषदेत कलावंतांच्या न्याय हक्कांचे २२ ठराव घेण्यात आले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी कांता मनेरे, विठ्ठल नंद, डी़एस़ खरात, अशोक लोंढे, भास्कर कांबळे, सीताराम वाटोरे, भारत देवरे, भीमराव धुतमल, देविदासराव वाघमारे, अंकुश वागेरे, उत्तमराव गायकवाड, यशोदाबाई इंगोले, भारती राऊत, ललिता सिरसाठ आदींनी प्रयत्न केले़कलावंतांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा इशारा४परभणी- लोककलावंतांचे प्रश्न १५ सप्टेंबरपर्यंत न सुटल्यास राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा लोककलावंत क्रांती परिषदेच्या बैठकीत देण्यात आला़४११ आॅगस्ट रोजी येथील महात्मा फुले कॉलनीत शाहीर रमेश गिरी, सोमनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली़ बैठकीस अशोक शिंदे, गौतम इंगोले, विश्वास रणवीर, विशाल गायकवाड, शफिक पटेल, राजरत्न सोनुले, भास्कर कांबळे, सुनीता कांबळे, वंदना खरात, डॉ़ अगस्ती इंगोले, माया नरवाडे आदींची उपस्थिती होती़४कलावंतांचे धूळ खात पडलेले अर्ज मंजूर करावेत, ५ हजार रुपये मासिक वेतन द्यावे, विना अट मानधन वितरित करावे, कलावंतांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा इ. मागण्या यावेळी करण्यात आल्या़ १५ सप्टेंबर रोजी याच मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला़ बैठकीस शाहीर काशीनाथ उबाळे, भास्कर गोडबोले, लक्ष्मण ससाने, सुरेखा साळवे, सुनीता कांबळे, अंकुश वाटुरे आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :parabhaniपरभणीGovernmentसरकार