शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार टप्प्यांत ४४८ पदांच्या निर्मितीस मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:39 IST

परभणीत शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास दोन मार्च २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार मान्यता देण्यात आली.

परभणी : परभणी येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता आवश्यक पदनिर्मितीबाबत शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने बुधवारी शासन निर्णय काढला आहे. याबाबत चार टप्प्यांत लागणारी ४४८ पदे निर्माण करण्यास या विभागाने मान्यता दिली आहे. हे आदेश सहसचिव शिवाजी पाटणकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत.

परभणीत शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास दोन मार्च २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. याबाबत २८ मार्चला शासन निर्णय काढण्यात आला. सदरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करिता गट- ‘अ’ ते गट ‘ड’मध्ये एकूण ४४८ पदे निर्मिती करण्यास, भरण्यास व त्यापोटी येणाऱ्या ९७ कोटी ६० लाख इतक्या अंदाजे खर्चास परवानगी देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवश्यक पदांच्या पदनिर्मितीस मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार गट ‘अ’ ते गट ‘क’मधील नियमित १८५ पदे, विद्यार्थी पदे ५९ त्याचप्रमाणे गट ‘क’ (काल्पनिक पदे-बाह्य स्रोतांनी) १३९ पदे, गट ‘ड’मधील काल्पनिक पदे व बाह्य स्रोतांनी मिळून ६५ पदे अशी एकूण ४४८ पदे चार टप्प्यांत निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

या पदांची होणार निर्मिती...अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक, सांख्यिकी अधिव्याख्याता, प्रशासकीय अधिकारी, लघुलेखक, ग्रंथपाल, कार्यालयीन अधीक्षक, सहायक ग्रंथपाल, समाजसेवा अधीक्षक, रोखपाल, वरिष्ठ सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, लघुलेखक, प्रक्षेपक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांच्यासह अन्य पदे भरली जाणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीMedicalवैद्यकीय