९ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थ एकजूट पॅनलचे ९ पैकी ९ सदस्य विजयी झाले होते. बुधवारी सरपंच- उपसरपंच निवडीसाठी बैठक पार पडली. त्यात कॉ. अंजली विलास बाबर यांची सरपंच पदी तर सिंधू धुमाळ यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून संजय धर्माधिकारी यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी अमर शिंदे यांनी सहकार्य केले. यावेळी जगन्नाथ पवार, हनुमान गायकवाड, छगन शिंदे, लक्ष्मीबाई ठेंगे, बायनाबाई पवार, गोदावरी बाबर या सदस्यांसह अब्दुल हाई, भगवानराव बाबर, बाळू पवार, कमलाकर बाबर, आण्णा कदम, राजेभाऊ राठोड, चंद्रभान ताकट, बबन बाबर, सतीश जाधव, माउली कदम, प्रवीण काटे, बाबासाहेब पवार, बबन गायकवाड, ज्ञानोबा सराटे, रमेश गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सूरपिंपरीच्या सरपंचपदी अंजली बाबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:16 IST