शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतक-यांनी गंगाखेडमध्ये जिल्हा बँकेचे शटर केले बंद

By admin | Updated: June 8, 2017 19:34 IST

बँकेमध्ये दिवसभर थांबूनही पीक विमा किंवा कापूस अनुदानाची खात्यावर जमा असलेली रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी

ऑनलाइन लोकमत
गंगाखेड ( जी. परभणी ), दि. 8  - बँकेमध्ये दिवसभर थांबूनही पीक विमा किंवा कापूस अनुदानाची खात्यावर जमा असलेली रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी 8 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास येथील जिल्हा बँकेच्या शाखेचे शटर बंद केल्याची घटना घडली.
गंगाखेड शहरात जिल्हा बँकेची शाखा आहे. या शाखेमध्ये तालुकाभरातील विविध ठिकाणच्या शेतकºयांचे बँक खाते आहे. या शेतकºयांच्या बँक खात्यावर पीक विमा, कापसाचे अनुदान आदी पैसे जमा आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून खात्यावर जमा असलेली रक्कम खातेदारक शेतकºयांनाच मिळत नसल्याचा प्रकार घडत आहे. पैसे काढण्यासाठी दलालामार्फत स्लीप भरुन दिल्यास सायंकाळी पैसे मिळत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून शेतकरी करीत आहेत. दिवसभर बँकेत थांबूनही पैसे मिळत नसल्याने संतप्त झालेल्या काही शेतक-यांनी ८ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास याबाबतचा जाब बँकेतील अधिकाºयांना विचारला. समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने या शेतकºयांनी बँकेचे शटर बंद करुन तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार संजय पवार यांची भेट घेऊन त्यांनी आपले गाºहाणे मांडले. तहसीलदार पवार यांनी बँकेतील अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर बँकेच्या अधिकाºयांनी परभणीहून रक्कम मागविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शटर उघडण्यात आले.  तोपर्यंत बँकेच्या आतमध्ये कर्मचारी काम करीत बसले होते. ३.३० वाजेच्या सुमारास परभणीहून कॅश आली. त्यानंतर संबंधित खातेदारांना त्यांच्या विड्रॉल स्लीपप्रमाणे रक्कम देण्यात आली. 
दरम्यान, संतप्त शेतकºयांनी बँकेचे शटर बंद केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.