शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मानवत शहरातील अवैध धंद्याविरोधात सर्वपक्षीय मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:06 IST

शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत, या धंद्याशी संबंधित लोकांची शहरात गुंडगिरी वाढत आहे यामुळे पोलीस प्रशासनाने याविरोधात कडक पावले उचलावीत या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

मानवत (परभणी ) : शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत, या धंद्याशी संबंधित लोकांची शहरात गुंडगिरी वाढत आहे यामुळे पोलीस प्रशासनाने याविरोधात कडक पावले उचलावीत या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

मागील काही दिवसांपासून शहरातील व्यापारी, उद्योजक, सामन्य नागरिकांवर गुंडाकडून होणारी दमदाटी थांबवावी, हद्दपारीचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढावीत, वाढलेली अवैध धंदे बंद करावेत तसेच नागरी सुरक्षा दलाची स्थापना करावी या मागण्यांसाठी सर्व पक्षीय कृती समितीच्या आज दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात आला. नगरपालिका पासुन  निघालेला हा मोर्चा मुख्य रस्त्याने जात पोलीस ठाण्यावर धडकला. येथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी बोलताना आमदार बाबाजानी दुरार्णी यांनी, बालकिशन चांडक या जेष्ठ नेत्याला घरात घुसुन शिवीगाळ केल्याचा घटनेचा निषेध केला. तर अशा घटना पुन्हा घडल्या तर पोलीस ठाण्याला घेराओ घालुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी दिला. यासोबतच शहरातील गुंडागर्दीला अवैध धंदेच  जबाबदार असल्याने हे धंदे बंद करा अशी मागणी माकपचे लिंबाजी कचरे पाटील यांनी केली. पोलीस निरीक्षक प्रदिप पालिवाल यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले व त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. 

मोर्चात जेष्ठ नेते बालकिशन चांडक, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष पंडितराव चोखट, माजी सभापती मदनराव लाडाणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष परमेश्वर शिंदे कॉंग्रेस चे शहराध्यक्ष शामभाऊ चव्हाण, राष्ट्रवादीचे मोइन अन्सारी,  अनंत भदर्गे, शिवसेनेचे शहरप्रमुख  राजेश कच्छवे, भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष शैलेश वडमारे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गजानन बारहाते यांच्यासह सर्व आजीमाजी नगरसेवक आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Morchaमोर्चाparabhaniपरभणीPolice Stationपोलीस ठाणेcrimeगुन्हेPoliticsराजकारण