शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्या मुलाचा शेतीवर होता डोळा; वाटणीस नकार दिल्याने वडिलांची झोपेतच केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 17:49 IST

पालम पोलिसांनी आरोपी मुलास अटक करून गजाआड केले आहे. 

ठळक मुद्देशेतीच्या वाटणीसाठी दारुड्या मुलाने केला बापाचा खून

पालम ( परभणी ) : तालुक्यातील पेंडू येथे शेतीच्या वाटणी करण्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा पोटच्या मुलाने खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी ( दि. १५ ) रात्री घडली. रामराव शेषराव धूळगुंडे (६० ) मृताचे नाव आहे. पालम पोलिसांनी आरोपी मुलास अटक करून गजाआड केले आहे. 

पेंडू शिवारात धूळगुंडे परिवाराची ९ एकर शेती आहे. रामराव धूळगुंडे यांना ३ मुले आहेत. या तिघांना ६ एकर शेती वाटणी करून गावानजीकची ३ एकर शेती त्यांनी स्वतः च्या उदरनिर्वाहासाठी ठेवली होती. या शेतातील हिस्सा मला विकायचा आहे तो वाटून द्या म्हणून उत्तम रामराव धूळगुंडे ( ३२ ) याने तगादा लावला होता.  तो व्यसनी असल्याने त्याची पत्नी मुलासह माहेरी राहते. शेती नावाने करून दिल्यास विक्री करेल या भीती पोटी आई वडिलांनी वाटणी करण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून उत्तम आईवडिलांना दारू पिऊन नेहमी मारहाण करत असे. 

बुधवारी पाऊस पडल्याने शेतात काम करुन थकलेले रामराव धूळगुंडे आखाड्यावर झोपले होते. कोणी नसल्याने संधीचा फायदा घेत उत्तमने  रामाराव यांना लाकडाने माराहाण करून खून केला. रामराव यांच्या पत्नी हरिबाई धूळगुंडे गुरुवारी सकाळी शेतात गेल्या असता त्यांना मृतदेह बाजेवर दिसला. बाजूच्या खोलीत आरोपी मुलाला पाहून त्यांनी घात झाल्याचा ठावो फोडत गाव गाठले. ग्रामस्थांना घेऊन त्यांनी पुन्हा घटनास्थळ गाठले. पोलीसांनी आरोपी उत्तमला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माने, जमादार नामदेव राठोड करीत आहेत. 

टॅग्स :MurderखूनparabhaniपरभणीFamilyपरिवार